Ranji Trophy : टीमही खूश आणि मुख्यमंत्रीही, ऐतिहासिक विजयानंतर जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंना बक्षीस जाहीर,किती मिळणार?
Ranji Trophy Winner : भारतीय क्रिकेट वर्तुळातील सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत नवा विजेता मिळाला आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट टीमने इतिहास घडवत पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्यांनी कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे.

जम्मू-काश्मीर क्रिकेट टीमसाठी 28 फेब्रुवारी 2026 हा दिवस अविस्मरणीय आणि ऐतिहासिक असा ठरला आहे. जम्मू काश्मीर टीमने अंतिम सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर रणजी ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला. उभयसंघातील अंतिम सामना अनिर्णित राहिला. मात्र जम्मू-काश्मीरने कर्नाटक विरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली होती. त्या जोरावर जम्मू-काश्मीर विजयी ठरली. (Photo Credit: PTI)

जम्मू काश्मीरने कर्नाटक विरुद्ध त्यांच्याच घरच्याच मैदानात महाअंतिम सामन्यात पहिल्या दिवसापासून घट्ट पकड मिळवली होती. जम्मूने काश्मीरने पाचव्या आणि अंतिम दिवशी दुसऱ्या डावात 342 धावा केल्या होत्या. त्यानंतर सामना अनिर्णित राहिला. जम्मूने पहिल्या डावात 291 धावांची आघाडी घेतली होती. जम्मू या जोरावर चॅम्पियन ठरली. (Photo Credit: PTI)

महाअंतिम सामना पाहण्यासाठी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय सामन्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्या संघाच्या खेळाडूंचा उत्साह वाढवत होते. (Photo Credit: PTI)

जम्मू काश्मीरच्या या ऐतिहासिक विजयानंतर आपल्या खेळाडूंसाठी बक्षिस रक्कम जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंसाठी 2 कोटी रुपये बक्षिस रक्कम जाहीर केली. (Photo Credit: PTI)

जम्मू काश्मीरच्या खेळाडूंना बीसीसीआयकडूनही बक्षिस रक्कम देण्यात येणार आहे. बीसीसीआय रणजी ट्ऱॉफी विजेत्या जम्मू-काश्मीर टीमला 5 कोटी रुपये देणार आहे. तर उपविजेत्या कर्नाटक टीमला 3 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. (Photo Credit: PTI)