FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, या स्पर्धेत जेतेपद मिळवणाऱ्या संघातील खेळाडूंना अंगठी दिली जाणार आहे. चला जाणून घेऊयात काय आहे खासियत...

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघांनी भाग घेतला होता. महिनाभर चाललेल्या या स्पर्धेतून अर्जेंटीना आणि स्पेन या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामना सोमवार 20 जुलै रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियमवर खेळला जाईल. (फोटो: Fifa World Cup Twitter)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील विजेत्या संघाला विश्वचषक ट्रॉफी, पदके आणि बक्षीस रक्कम दिली जाईल. आतापर्यंत असंच होत आलं आहे. पण यावेळी विजेत्या संघातील खेळाडूंना विशेष अंगठी दिली जाणार आहे. अंतिम सामन्याच्या काही तासाआधी फिफाने विजेत्या संघाच्या खेळाडूंना विशेष अंगठ्या प्रदान करण्याची घोषणा केली. (फोटो: Fifa World Cup Twitter)

अमेरिकेत विविध खेळांमध्ये विजयी संघातील खेळाडूंना अंगठ्या देण्याची परंपरा आहे. बास्केटबॉल लीग एनबीएची चॅम्पियनशिप रिंग आणि एमव्हीपी रिंग जगभरात प्रसिद्ध आहेत. ही अमेरिकन क्रीडा परंपरा कायम ठेवत फिफाने यावर्षी विजयी संघाच्या खेळाडूंना या अंगठ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो: Getty Image)

अंतिम सामन्यातील विजयी संघाला फिफाकडून 30 अंगठ्या मिळतील. या अंगठ्या या विश्वचषकाचे एक वैशिष्ट्य ठरतील.प्रत्येक अंगठीवर 1 पासून सुरू होऊन 2026 पर्यंतचा एक अद्वितीय क्रमांक असेल. या अंगठ्या सोन्याच्या बनवलेल्या असून त्यात अनेक लहान हिरे जडवलेले आहेत. अंगठीच्या एका बाजूला विश्वचषक ट्रॉफी असेल, तर दुसऱ्या बाजूला विजयी संघाची ओळख असेल. (फोटो: Getty Image)

फिफाने विश्वचषक 2026 च्या स्मरणार्थ एकूण 2026 अंगठ्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यापैकी केवळ 30 अंगठ्या खेळाडूंना प्रदान केल्या जातील. उर्वरित 1996 अंगठ्या जगभरातील चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. त्या एका विशिष्ट किंमतीत किंवा बोली लावून खरेदी करू शकतील.(फोटो: Getty Image)