FIFA World Cup 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत होताच किलियन एम्बाप्पेसोबत काय झालं?
Kylian Mbappe: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपदाचं फ्रान्सचं स्वप्न भंगलं आहे. उपांत्य फेरीत स्पेनने फ्रान्सला 2-0 ने मात दिली. या पराभवासह किलियन एम्बाप्पेने करिअरमध्ये पहिल्यांदाच असा दिवस पाहिला. कारण यापूर्वीचा इतिहास काही वेगळा होता.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सला पराभवाची धूळ चारली. या पराभवासह फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पेला पहिल्यांदाच एक वाईट दिवस पाहावा लागला आहे. यापूर्वी त्याच्या कारकिर्दीत कधीच असं घडलं नव्हतं. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून पराभव होताच किलियन एम्बाप्पेचा बाद फेरीतील अपराजयचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी एम्बाप्पेने बाद फेरीत कधीच सामना गमावला नव्हता. पण आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. एम्बाप्पेचा हा तिसरा वर्ल्डकप आहे. (Photo: Getty Images)

किलियन एम्बाप्पेने पहिला फिफा वर्ल्डकप 2018 मध्ये खेळला होता. तेव्हा फ्रान्सने विजय मिळवला होता. 2022 मध्येही एम्बाप्पेचा फ्रान्स संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होती. पण बाद फेरीत कधीच सामना गमावला नव्हता. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत त्याच्या या यशाला नजर लागली. बाद फेरीत पहिल्यांदाच स्पेनकडून 2-0 ने मात खावी लागली. फिफा वर्ल्डकपच्या इतिहासातील बाद फेरीत एम्बाप्पेचा हा पहिला पराभव आहे. (Photo: Getty Images)

फ्रान्सचा प्रवास उपांत्य फेरीत संपुष्टात आल्याने एम्बाप्पेचं गोल्डन बूटचं स्वप्नही भंगणार आहे. सध्या 8-8 गोलसह मेस्सी आणि एम्बाप्पे पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे मेस्सीचा एक गोल आणि गोल्डन बूटचं स्वप्न भंगेल. (Photo: Getty Images)