रवींद्र जडेजा सर जेफरी बॉयकॉट यांचा लाडका! आवडता खेळाडू असण्याचं कारण काय? जाणून घ्या
रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता फक्त वनडे आणि कसोटी मालिका खेळणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. पण आता फक्त कसोटी सामने खेळत आहे. वनडे संघात त्याला स्थान नाही. असं असताना इंग्लंडचे महान फलंदाज सर जेफरी बॉयकॉट यांनी लाडका खेळाडू म्हणून रवींद्र जडेजाला पसंती दिली आहे.

क्रिकेटमध्ये आवडत्या खेळाडूंची यादी काढली तर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा अशी नावं पुढे येतील. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाचं नाव घेणारे खूपच कमी असतील. या यादीत इंग्लंडचे महान क्रिकेटर सर जेफरी बॉयकॉट यांचं नाव आहे. (Photo: Getty/pti)
मायकल वॉनने एका कार्यक्रमात जेफरी बॉयकॉट यांना तुमचा आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न केला. फॅब फोर म्हणजेच रुट, विराट, केन आणि स्मिथबाबत बोलायचं तर 21व्या शतकातील त्यांचा आवडता खेळाडू कोण असेल? तेव्हा जेफरी बॉयकॉट यांनी सांगितलं की एक भारतीय आहे आणि त्याचं नाव रवींद्र जडेजा आहे. (Photo: Getty/pti)
सर जेफरी बॉयकॉट याने रवींद्र जडेजा आवडता खेळाडू असण्याचं कारणही सांगितलं आहे. जेफरी बॉयकॉट म्हणाले की, तो एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. तो बॅटिंग आणि बॉलिंग करतो. इतकंच काय तर चांगला क्षेत्ररक्षकही आहे. (Photo: Getty/pti)
जेफरी बॉयकॉटने रवींद्र जडेजासोबत झालेल्या पहिल्या मुलाखतीचा उल्लेखही केला. त्यांनी सांगितलं की, मागच्या वर्षी भारतात गेलो होते तेव्हा पहिल्यांदा जडेजाची भेट झाली होती. तेव्हा त्याला सांगितलं की तू माझा आवडता खेळाडू आहे. बॉयकॉट यांनी पुढे सांगितलं की, मी जेव्हा त्याला असं बोललो तेव्हा त्याने प्रतिक्रिया देताना सांगितलं की असं होऊ शकत नाही. (Photo: Getty/pti)
जेफरी बॉयकॉट यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1940 या वर्षी झाला. त्याने 1964 ते 1982 या कालावधीत इंग्लंडसाठी 108 कसोटी सामने खेळले. यात त्याने 47.72 च्या सरासरीने 8114 धावा केल्या. यात 22 शतकं आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. सर जेफरी बॉयकॉट यांी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण 159 शतकं ठोकली. यात 152 शतकं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये, तर 8 शतकं लिस्ट ए मध्ये ठोकली. (Photo: Getty/pti)