IPL 2026 : मोहम्मद सिराजचा कारमाना, सर्वात वेगवान बॉल टाकण्याचा रेकॉर्ड ब्रेक

Mohammed Siraj : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध धारदार बॉलिंग केली. सिराजने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 3 विकेट्स घेत चेन्नईच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं.

| Updated on: May 22, 2026 | 4:56 PM
1 / 5
गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफचं तिकीट मिळवलंय.  गुजरातने गुरुवारी 21 मे रोजी चेन्नईला पराभूत करुन टॉप 2 मधील आपलं स्थान आणखी भक्कम केलं. गुजरातच्या विजयात मोहम्मद सिराजने या प्रमुख भूमिका बजावली. (Photo Credit: PTI)

2 / 5
गुजरातने घरच्या मैदानात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चेन्नई विरुद्ध 229 धावा केल्या. त्यानंतर गुजरातने 230 धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईचा 140 रन्सवर बाजार उठवला. मोहम्मद सिराज याने या दरम्यान त्याच्या कोट्यातील पहिल्या 10 बॉलमध्येच 3 विकेट्स घेऊन चेन्नईचं टॉप ऑर्डर उद्धवस्त केलं. (Photo Credit: PTI)

3 / 5
सिराजने या सामन्यादरम्यान मोठा कारनामा केला. सिराजने 19 व्या मोसमातील सर्वात वेगवान बॉल टाकण्याचा कारनामा केला. सिराजने चेन्नईच्या डावातील पाचव्या ओव्हरमध्ये ताशी 154.8 किमी वेगाने बॉल टाकला.  (Photo Credit: PTI)

4 / 5
सिराजने यासह गुजरात टायटन्सच्या अशोक शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केला. अशोकने ताशी 154.2 किमी वेगाने बॉल टाकला होता. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  त्यामुळे गोलंदाजाने खरंच इतक्या वेगाने बॉल टाकला की तांत्रिक चूक होती? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
आता खरं खोटं जे काही असेल मात्र गुजरातला विजयी करण्यात सिराजने योगदान दिलं इतकं मात्र निश्चित. सिराजने आपल्या कामगिरीने निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिलं. सिराजला आगामी अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे. मात्र सिराजला अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजमधून वगळण्यात आलंय. सिराजने त्यानंतर ही कामगिरी करुन दाखवली.  (Photo Credit: PTI)

Follow Us