GT vs KKR : दुखापतीकडून आणखी 1 शिकार, गुजरातला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू मोसमातून आऊट

Gujarat Titans IPL 2026 : गुजरात टायटन्सने टॉम बँटनला 19 व्या मोसमाआधी झालेल्या मिनी ऑक्शनमधून 75 लाख रुपयांची बोली लावून आपल्या गोटात घेतलं होतं. मात्र बँटनला एकही सामना खेळता संपूर्ण हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे. हे सर्व दुखापतीमुळे झालंय.

| Updated on: Apr 17, 2026 | 7:02 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातून दुखापतीमुळे खेळाडूचं बाहेर होण्याचं सत्र सुरुच आहे. आधीच बॅकफुटवर असलेल्या गुजरात टायटन्सला मोठा झटका लागला आहे. गुजरातचा विकेटकीपर बॅट्समन टॉम बँटन याला 19 व्या मोसमातून एकही सामना न खेळता दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलंय. आयपीएलकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
टॉम बँटनला दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडावं लागलं आहे. टॉमला बोटाला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण मोसमाला मुकावं लागलं आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
बँटनला टी 20 क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. बँटनने टी 20 क्रिकेटमध्ये 5 हजारांपेक्षा धावा केल्या आहेत. तसेच बँटनने 4 शतकंही झळकावली आहेत. गुजरातने बँटनसाठी 75 लाख रुपये मोजले होते. (Photo Credit : PTI)

4 / 5
बँटनच्या जागी गुजरात टायटन्स टीममध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टेरहुएजेन याचा समावेश करण्यात आला आहे. कॉनरने दक्षिण आफ्रिकेचं 5 टी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. कॉनरने या दरम्यान 2 अर्धशतकांसह 200 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
दरम्यान गुजरात टायटन्ससमोर 17 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान असणार आहे. गुजरातने आतापर्यंत 19 व्या मोसमातील 4 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. (Photo Credit : PTI)

Follow Us