ICC Annual Conference: आयसीसीने वनडे क्रिकेट आणि या दोन संघांबाबत घेतला मोठा निर्णय
आयसीसीने एडिनबर्गमध्ये 4 दिवसीय वार्षिक परिषदेत चार मोठे निर्णय घेतले गेले. या बैठकीत वनडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि काही संघांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले गेला. आयसीसीची ही बैठक 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान पार पडली.

एडिनबर्गमध्ये आयसीसी वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान चाललेल्या चार दिवसीय बैठकीत बरीच खलबतं झाली. या बैठकीत आयसीसीने काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले. हे निर्णय वनडे क्रिकेट आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत होते. (Photo: Getty Images)

आयसीसीने वार्षिक बैठकीत युएसए क्रिकेट आणि कॅनडा क्रिकेटबाबत आपला निर्णय कायम ठेवला आहे. या दोन्ही क्रिकेट बोर्डांना निलंबित ठेवण्याचा हेतू स्पष्ट केला आहे. (Photo: Getty Images)

आयसीसी म्हंटलं की, वनडे क्रिकेटमध्ये षटकांची संख्या कमी करण्याचा कोणताही हेतू नाही. वनडे सामन्यांमध्ये रस निर्माण करण्यासाठी षटकांची संख्या 50वरून 40 करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र आयसीसीने त्याला केराची टोपली दाखवली आहे. (Photo: Getty Images)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघांची संख्या नऊ वरून 12 करण्याचा प्रस्तावही गुंडाळण्यात आला आहे. यापूर्वी वर्ल्ड टेस्टमध्ये अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघाचा सहभाग होणार, अशा बातम्या येत होत्या. पण वार्षिक बैठकीत या मुद्दा खोडून काढण्यात आला आहे. (Photo: Getty Images)

दरम्यान, आयसीसीच्या सदस्य संख्येत एका संघाची वाढ झाली आहे. मॉरिशस संघ आता आयसीसी सदस्य झाला आहे. वार्षिक बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मॉरिशसला असोसिएट मेंबरशिप मिळाला आहे. आयसीसी सदस्य असलेला 111 वा देश आहे. (Photo: Getty Images)