IND vs AFG : हर्ष दुबेला डच्चू, मानव सुथारचं पदार्पण, युवा खेळाडूची आकडेवारी कशी?
Manav Suthar Test Debut : अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून टीम इंडियाकडून दोघांपैकी एकाचं पदार्पण होणार हे निश्चित होतं. त्यामुळे मानव सुथार आणि हर्ष दुबे या दोघांमध्ये टफ फाईट होती. मात्र टीम मॅनेजमेंटने मानव सुथार याच्यावर विश्वास दाखवला.

अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून युवा फिरकीपटू मानव सुथार याचं पदार्पण झालं आहे. सामन्याआधी मानवला कॅप देऊन त्याचं भारतीय संघात स्वागत करण्यात आलं. (Photo Credit : Indian Cricket Team FB Page)

मानव सुथार टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 319वा खेळाडू ठरला आहे. तसेच मानव 2021 नंतर टीम इंडियाकडून पदार्पण करणारा पहिला स्पिनर ठरला आहे. (Photo Credit : Indian Cricket Team FB Page)

टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादव याने मानव सुथार याला कॅप दिली. मानव सुथार याचं यासह भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं. (Photo Credit : Indian Cricket Team FB Page)

मानव आणि हर्ष दुबे या दोघांपैकी एकाला पदार्पणाची संधी देण्यात येणार असल्याचं हेड कोच गौतम गंभीर यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र अखेरच्या क्षणी मानवला संधी मिळाली. या निमित्ताने दोघांचे आकडे जाणून घेऊयात. (Photo Credit : Indian Cricket Team FB Page)

मानव आणि हर्ष या दोघांचे आकडे अपवाद वगळल्यास सारखेच आहेत. राजस्थानसाठी खेळणाऱ्या मानवने 29 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 129 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच 1 शतक आणि 6 अर्धशतकासह 945 धावा केल्या आहेत. तर विदर्भाच्या हर्ष दुबे याने 25.65 च्या सरासरीने 9 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 26 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Indian Cricket Team FB Page)