IND vs AFG : डेब्युटंट मानव सुथारचा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत धमाका, 25 वर्षांनंतर असं घडलं

Manav Suthar, IND vs AFG Test: भारताचा युवा फिरकीपटू मानव सुथार याने कसोटी क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. मानवने त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवून खास कामगिरी केली. जाणून घ्या मानवने नक्की काय केलं.

| Updated on: Jun 07, 2026 | 5:16 PM
1 / 5
अफगाणिस्तान विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी डेब्युटंट मानव सुथार याने इतिहास घडवला आहे. मानवने कसोटी कारकीर्दीतील पहिलीच विकेट घेत अविस्मरणीय कामगिरी करुन दाखवली आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
हर्ष दुबेऐवजी मानव सुथार याला एकमेव कसोटीत पदार्पणाची संधी देण्यात आली.  मानवने त्याच्या कारकीर्दीतील चौथ्या बॉलवर  अब्दुल मलिक याला आऊट करत पहिलीवहिली विकेट मिळवली.  (Photo Credit : PTI)

3 / 5
मानव सुथार याने त्याच्या कारकीर्दीतील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळून मानाच्या यादीत स्थाान मिळवलं. मानव गेल्या 25 वर्षांत पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. मानवआधी 2001 साली टीनू योहानन याने इंग्लंड विरुद्ध आपल्या कारकीर्दीतील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळवली होती. (Photo Credit : PTI)

4 / 5
मानव कसोटी पदार्पणात पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेणारा आठवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. टीम इंडियासाठी याआधी मोंटू बॅनर्जी, मनोहर हर्डीकर, वामन कुमार, चेतन शर्मा, डब्ल्यूवी रमन आणि निलेश कुलकर्णी या गोलंदाजांनी त्यांच्या कसोटी कारकीर्दीतील पहिल्याच सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेण्याची कामगिरी केली होती.  (Photo Credit : PTI)

5 / 5
मानव सुथार याने अफगाणिस्तान विरुद्ध कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकूण 3 विकेट्स मिळवल्या. मानवने एकूण  15.5 पैकी 7 मेडन ओव्हर टाकल्या आणि फक्त 21 धावा दिल्या. (Photo Credit : PTI)

Follow Us