IPL 2026 : एका मोसमात सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज, पहिला स्थानी चेन्नईचा बॉलर

Anshul Kamboj IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याची गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी चांगली धुलाई केली. अंशुल कंबोज याने चेन्नई विरुद्ध आपल्या कोट्यातील 4 ओव्हरमध्ये 56 रन्स लुटवल्या.

Sanjay patil | Updated on: May 22, 2026 | 2:11 AM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत फलंदाजांकडून आतापर्यंत षटकारांचा पाऊस पाडण्यात आला आहे. या निमित्ताने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक सिक्स खाणारा गोलंदाज कोण आहे? याबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेत फलंदाजांकडून आतापर्यंत षटकारांचा पाऊस पाडण्यात आला आहे. या निमित्ताने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक सिक्स खाणारा गोलंदाज कोण आहे? याबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

2 / 5

चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजाच्या नावावर हा नकोसा विक्रम आहे. अंशुल कंबोज याच्या गोलंदाजीवर 19 व्या मोसमात फलंदाजांनी सर्वाधिक 34 षटकार खेचले आहेत.

3 / 5

अंशुल कंबोज याने सर्वाधिक सिक्सबाबत गुजरात टायटन्सचा गोलंदाज राशीद खान याला पछाडलं. राशिदच्या गोलंदाजीवर गेल्या मोसमात फलंदाजांनी 33 षटकार लगावले होते. (Photo Credit: PTI)

4 / 5

मोहम्मद सिराज याच्या बॉलिंगवर आयपीएल 2022 स्पर्धेत फलंदाजांनी 31 षटकार लगावले होते. वानिंदु हसरंगा याच्या बॉलिंगवर 2022 साली 30 षटकार खेचले होते. तर फलंदाजांनी 2024 साली युझवेंद्र चहल याच्या बॉलिंगवर 30 षटकार लगावले होते. (Photo Credit: PTI)

5 / 5

दरम्यान आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वाधिक सिक्स खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अंशुल कंबोज याच्यानंतर कगिसो रबाडा दुसऱ्या स्थानी आहे. कगिसो रबाडा याने 30 सिक्स खाल्ले आहेत. (Photo Credit: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us