Kagiso Rabada : पर्पल कॅप विनर कगिसो रबाडा याची वाईट कामगिरी, 19 व्या मोसमात चौकार-षटकारांचं शतक

Kagiso Rabada IPL 2026 : कगिसो रबाडा याने सलग दुसऱ्यांदा पर्पल कॅप जिंकण्याची कामगिरी केली. मात्र रबाडाच्या नावावर सर्वात वाईट विक्रमाची नोंद झाली आहे. रबाडा अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

Sanjay patil | Updated on: Jun 01, 2026 | 6:36 PM
1 / 5
कगिसो रबाडा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील पर्पल कॅप विजेता ठरला. एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. रबाडाने पर्पल कॅपसह 2 नकोसे विक्रम आपल्या नावावर केले.  (Photo Credit :  PTI)

कगिसो रबाडा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील पर्पल कॅप विजेता ठरला. एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. रबाडाने पर्पल कॅपसह 2 नकोसे विक्रम आपल्या नावावर केले. (Photo Credit : PTI)

2 / 5

रबाडाने गुजरातचं 19 व्या मोसमात एकूण 17 सामन्यांत प्रतिनिधित्व केलं. रबाडाने या 17 सामन्यांत एकूण 29 विकेट्स मिळवल्या. रबाडाने या दरम्यान 9.68 च्या इकॉनमीने धावा लुटवल्या. तसेच रबाडाच्या बॉलिंगवर फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत चौकार-षटकार लगावले. (Photo Credit : PTI)

3 / 5

कगिसो रबाडा याच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी एकूण 100 चौकार-षटकार लगावले. रबाडा यासह स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला. (Photo Credit : PTI)

4 / 5

रबाडा एका मोसमात सर्वाधिक षटकार खाणारा पहिला गोलंदाज ठरला. रबाडाच्या गोलंदाजीवर फलंदाजानी तब्बल 40 षटकार लगावले. याआधी कोणत्याही गोलंदाजाने 35 पेक्षा जास्त सिक्स खाल्ले नव्हते. (Photo Credit : PTI)

5 / 5

दरम्यान कगिसो रबाडा याने पर्पल कॅप जिंकण्यासह खास कामगिरी करुन दाखवली. रबाडाची पर्पल कॅप जिंकण्याची चौथी वेळ ठरली. रबाडाने याआधी 2020 साली 30 विकेट्स मिळवल्या होत्या. रबाडाआधी भुवनेश्वर कुमार, ड्वेन ब्राव्हो आणि हर्षल पटेल या तिघांनी प्रत्येकी 2-2 वेळा पर्पल कॅपवर आपलं नाव कोरलं होतं. (Photo Credit : PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us