जो रूटची ऐतिहासिक कामगिरी, रिकी पाँटिंगला टाकलं मागे! आता सचिन-अँडरसन निशाण्यावर

Joe Root, ENG vs PAK 3rd Test: इंग्लंडचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार जो रूटने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यासह स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंगच्या पुढे निघून गेला आहे. नेमकं काय केलं ते जाणून घ्या...

| Updated on: Sep 09, 2026 | 5:12 PM
1 / 5
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक नोंद केली आहे. जो रूट पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला आणि स्टीव्हला मागे सोडलं. (PHOTO CREDIT- PTI)

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक नोंद केली आहे. जो रूट पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला आणि स्टीव्हला मागे सोडलं. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5

जो रूटच्या कसोटी कारकि‍र्दीचा हा 169वा सामना आहे. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. आता त्याच्या पुढे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5

जो रूट तिसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरल्यानंतर स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंगला मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही कर्णधारांनी 168-168 सामने खेळले आहेत. तर सचिन तेंडुलकर 200 कसोटी सामन्यांसह सर्वात पुढे आहे. जेम्स अँडरसनने 188 कसोटी सामने खेळले आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5

इंग्लंड संघासाठी पाकिस्तानविरुद्धचा तिसरा कसोटी सामना खास ठरला आहे. कारण 2010 नंतर प्रथमच इंग्लंडने कसोटी मालिकेतील तिन्ही सामन्यात एकच प्लेइंग 11 उतरवली. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5

पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसर्‍या सामन्यानंतर इंग्लंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे. मालिका खिशात घातल्यानंतर आता क्लिन स्वीप देण्याचा मानस आहे. पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी आणि दुसऱ्या कसोटीत 194 धावांनी पराभूत केलं. (PHOTO CREDIT- PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us