IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामन्यातही जो रूटने कमाल केली. खरं तर या मालिकेतील तिन्ही सामन्यात त्याची कामगिरी संस्मरणीय राहिली. या तिन्ही सामन्यात मोठी खेळी करून त्याने विक्रम रचला आहे.

| Updated on: Jul 19, 2026 | 9:07 PM
1 / 5
इंग्लंडचा फलंदाज जो रूट याची सातत्यपूर्ण खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनडे मालिकेत त्याने एक नवा विक्रम रचला आहे. आजवर वनडे सामन्यात अशी कामगिरी कोणत्याही फलंदाजाला करता आली नव्हती. (Photo: ICC Twitter)

2 / 5
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं आहे. या मालिकेतील तिन्ही सामन्यात जो रूट नाबाद राहिला. भारतीय गोलंदाजांनी सर्व डावपेच आखले पण त्यात काही यश आलं नाही. (Photo: England Cricket Twitter)

3 / 5
जो रूटने मालिकेच्या पहिल्या सामन्यात 76 धावांची आणि दुसऱ्या सामन्यात 99 धावांची नाबाद उत्कृष्ट खेळी केली होती. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात जो रूटने अवघ्या 48 चेंडूंमध्ये 74 धावांची नाबाद खेळी केली. (Photo: England Cricket Twitter)

4 / 5
तीन सामन्यांच्या मालिकेत रूटने एकूण 257 चेंडूंचा सामना करत 249 धावा केल्या. एकदाही बाद न होता वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. इंग्लंडच्या जॉस बटलरचा 248 धावांचा विक्रम मोडला. (Photo: England Cricket Twitter)

5 / 5
जो रुटने इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात सलग सहा वनडे डावांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा जो रूट हा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. इतकंच काय तर गेल्या चार डावांमध्ये नाबाद राहिला आहे. (Photo: England Cricket Twitter)

Follow Us