Shreyas Iyer : श्रेयस अय्यरचा कर्णधारपद मिळताच धमाका, काही तासांतच विस्फोटक खेळी, किती धावा केल्या?

Triumphs Knights MNE vs SoBo Mumbai Falcons: श्रेयस अय्यर याने वादळी अर्धशतक झळकावत मुंबई टी 20 लीग 2026 स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील टीमला पराभूत करुन आपल्या संघाला जिंकवलं.

| Updated on: Jun 07, 2026 | 12:04 PM
1 / 5
श्रेयस अय्यर याने टी 20i टीम इंडियाचं कर्णधारपद मिळताच धमाका केला आहे. श्रेयसने टी 20 मुंबई लीग 2026 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात सोबो मुंबई फाल्कंस टीमसाठी मॅचविनिंग खेळी केली. श्रेयसने या खेळीसह टीमला विजयी करण्यात योगदान दिलं. (Photo Credit : PTI)

2 / 5
सूर्यकुमार यादव याने केलेल्या खेळीच्या जोरावर ट्रायम्फ नाईट्स टीमने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. (Photo Credit : PTI)

3 / 5
सोबो फाल्कंसची 148 धावांचा पाठलाग करताना 2 आऊट 41 अशी स्थिती झाली होती. मात्र कर्णधार श्रेयस अय्यर याने संकटमोचकाची भूमिका बजावत निर्णायक केळी केली आणि टीमला जिंकवलं. (Photo Credit : PTI)

4 / 5
श्रेयसने 36 बॉलमध्ये 169.44 च्या स्ट्राईक रेटने 61 धावांची खेळी केली.  श्रेयसने या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. श्रेयसच्या या खेळीच्या जोरावर टीमने 5 विकेट्सने विजय मिळवला. (Photo Credit : PTI)

5 / 5
श्रेयस अय्यर आयर्लंड दौऱ्यातील टी 20i मालिकेतून कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. (Photo Credit : PTI)

Follow Us