रिकी पाँटिंगला सतावतेय ही भीती..! क्रिकेट संघाची मालकी घेताच व्यक्त केली चिंता

रिकी पाँटिंग आता क्रिकेट वर्तुळात एका नव्या भूमिकेत आले आहेत. आता कोच नाही तर एका संघाचे मालक आहेत. पण मालक होताच त्यांनी वनडे क्रिकेटची लोकप्रियता कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली.

| Updated on: Sep 09, 2026 | 4:54 PM
1 / 5
रिकी पाँटिंग यांच्याकडे क्रिकेट संघाची मालकी आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या तिसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलिया चॅम्पियनची मालकी घेतली. पुनीत सिंह यांच्यासोबत सहमालक असणार आहे. 8 सप्टेंबरला मेलबर्नमध्ये झालेल्या कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली गेली. (Photo: PTI)

रिकी पाँटिंग यांच्याकडे क्रिकेट संघाची मालकी आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या तिसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलिया चॅम्पियनची मालकी घेतली. पुनीत सिंह यांच्यासोबत सहमालक असणार आहे. 8 सप्टेंबरला मेलबर्नमध्ये झालेल्या कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली गेली. (Photo: PTI)

2 / 5

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा मालकी हक्क मिळाल्यानंतर रिकी पाँटिंगने आनंद व्यक्त केला. टीम आणि पुनीत सिंह यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं. या स्पर्धांमुळे जगभरातील क्रिकेटपटूंना जे रिटायर झाले आहेत किंवा त्या वेशीवर आहे, त्यांना कमवण्याची संधी मिळते. (Photo: PTI)

3 / 5

रिकी पाँटिंगने पीटीआयशी बोलताना एक व्यथाही मांडली. रिकी पाँटिंग म्हणाला की, गेल्या काही वर्षात सर्वाधिक टी20 सामने होत आहे. जगभरात फ्रेंचायझी स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे 50 षटकांचं क्रिकेट कमी होणार आहे. खरं सांगायचं तर असंच होणार आहे आणि असं व्हावं, हे मला अजिबात पटणारं नाही. (Photo: PTI)

4 / 5

रिकी पाँटिंगने सांगितलं की, वनडे फॉर्मेट मला आवडतो, पण कुठे ना कुठे काही तरी सोडवंच लागले. कसोटी क्रिकेट आता भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेत खेळलं जातं. कारण त्या देशांना तसं वाटतं. त्यामुळे, कशाचा तरी त्याग करावा लागेल आणि तो त्याग अर्थातच एकदिवसीय क्रिकेटचा आहे. (Photo: PTI)

5 / 5

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचं तिसरं पर्व 3 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचं कर्णधारपद डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर असणार आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us