Asia Cup 2026: पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पायात विराट कोहलीची बुटं! संघाचा असा झाला फायदा

विराट कोहलीचा शू ब्रँड One8 सध्या चर्चेत आहे. या ब्रँडची बुटं पाकिस्तानी क्रिकेटपटू नाशरा संधू हीने परिधान केले होते. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात बुटं परिधान करून मैदानात उतरली होती. या सामन्यात नाशराने 7 धावा देत 6 विकेट काढल्या.

| Updated on: Sep 08, 2026 | 4:34 PM
1 / 5
वुमन्स टी20 आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या नाशरा संधूने विराट कोहलीच्या कंपनीची बुटं घालून कमाल केली. विराट कोहलीच्या वन एट या कंपनीचे बुटं घातली होती. ही बुटं लकी ठरली असंच म्हणावं लागेल. कारण तिने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी केली. (Photo: Getty)

वुमन्स टी20 आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या नाशरा संधूने विराट कोहलीच्या कंपनीची बुटं घालून कमाल केली. विराट कोहलीच्या वन एट या कंपनीचे बुटं घातली होती. ही बुटं लकी ठरली असंच म्हणावं लागेल. कारण तिने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी केली. (Photo: Getty)

2 / 5

नाशरा संधूने हाँग काँगविरुद्ध भेदक गोलंदाजी केली. तिने फक्त 7 धावा देत 6 विकेट काढल्या. विराट कोहलीच्या कंपनीचे बुट घालून तिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. टी20 क्रिकेटमधील तिचा हा बेस्ट परफॉर्मेन्स आहे. (Photo: Getty)

3 / 5

पाकिस्तान संघाच्या फक्त नाशरा संधूने विराट कोहलीच्या कंपनीचे शूज परिधान केले होते. त्यामुळे चर्चा तर होणारच नाही.. तिच्या कामगिरीमुळे पाकिस्तानचाही फायदा झाला. पाकिस्तानने हाँग काँगला 72 धावांनी पराभूत केलं. (Photo: Getty)

4 / 5

नाशरा संधूच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानला दुहेरी फायदा झाला आहे. मोठ्या विजयामुळे पाकिस्तानला आत्मविश्वास मिळाला आहे. भारताने पराभूत केल्यानंतर त्याला तडा गेला होता. दुसरं म्हणजे पाकिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे. (Photo: Getty)

5 / 5

उपांत्य फेरीत पाकिस्तानसमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. 11 सप्टेंबरला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. आता उपांत्य फेरीत नाशरा संधू विराट कोहलीची बुटं परिधान करून उतरणार का? हा प्रश्न आहे. (Photo: Getty)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us