किंगची भेट घेण्यापूर्वीच पाकिस्तानी खेळाडूची बंडखोरी, तिसऱ्या कसोटी आधी केलं असं काही
पाकिस्तानचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. या मालिकेतील शेवटचा सामना शिल्लक असून निम्म्याहून अधिक संघ बदलला आहे. असं असताना तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ बर्मिंघममध्ये दाखल झाला आहे.

पाकिस्तानचा संघ तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी बर्मिंघममध्ये दाखल झाला आहे. हा सामना 9 सप्टेंबरला होणार आहे. असं असताना 2 सप्टेंबर 2026ला किंग चार्ल्स तिसरे यांची पाकिस्तानी संघाने भेट घेतली. ही भेट लंडनच्या क्लारेसं हाउसमध्ये झाली. इतकंच काय तर लाज राखण्यासाठी संघातून बाहेर काढलेल्या खेळाडूनांही किंगची भेट घेण्याचे आदेश दिले होते. (Photo: Getty)
द टेलिग्राफने सूत्रांच्या आधारावर वृत्त दिलं की, भेटीदरम्यान संघात विचित्र वातावरण होतं. पाकिस्तान संघातून बाहेर केलेल्या अली उस्मान, आमिर जमाल, खुर्रम शाहजाद आणि मुहम्मद अवाइस जफरही या कार्यक्रमात होते. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा आणखी एक म्हणजेच पाचवा खेळाडू यात होता. पण त्याने भेटीच्या कार्यक्रमास येण्यास नकार दिला. (Photo: Getty)
पहिल्या दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर संघात तडकाफडकी बदल केले आहेत. काही खेळाडूंना रिलीज केलं आहे. पण नवीन खेळाडू अजूनही पोहोचले नाहीत. त्यामुळे या कार्यक्रमात खेळाडूंची उपस्थिती कमी असण्याची शक्यता होती. त्यामुळे लाज राखण्यासाठी संघातून बाहेर काढलेल्या खेळाडूंना भेटण्याचे आदेश दिले होते. (Photo: Getty)
किंग्स चार्ल्स यांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने त्यांना खेळाडूंनी सही केलेली बॅट दिली. या दरम्यान पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांनीही एक भेट दिली. (Photo: Getty)
लंडनमध्ये किंग चार्ल्स यांच्या भेटीनंतर पाकिस्तानी संघ बर्मिंघममध्ये दाखल झाला. या ठिकाणी 9 सप्टेंबरला तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. आता हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई असणार आहे. कारण ही मालिका आधीच पाकिस्तानने गमावला आहे. (Photo: Getty)