चुकीला माफी नाही..! शफाली वर्माला डिवचणं फातिमा सनाला पडलं महागात, झालं असं की…
वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना भारताने सहज जिंकला. पण पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शफाली वर्माला बाद केल्यानंतर तिला डिवचलं होतं.

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला अक्षरश: चिरडलं. या सामन्यात पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली. कारण चांगली सुरुवात केल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. हा सामना भारताने 7 विकेट राखून जिंकला. (Photo: Getty Images)
पाकिस्तानचा आशिया कप स्पर्धेत मानहानीकारक पराभव झाला. असं असताना पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाच्या एका कृतीने तोंडघशी पडले. फातिमा सनाला आयसीसीने दंड ठोठावला आहे. (Photo: Getty Images)
पाकिस्तानकडून कर्णधार फातिमा सनाने तीन विकेट काढल्या होत्या. पण ओपनर शफाली वर्माची विकेट घेतल्यानंतर तिच्याकडे पाहून पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला होता. (Photo: Getty Images)
आयसीसीने फातिमाची ही कृती आचारसंहितेचं उल्लंघन मानलं आहे. या कृतीसाठी आयसीसीने पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाच्या फिमधून 10 टक्के दंड आकारला आहे. (Photo: Getty Images)
या सामन्यात भारताने पाकिस्तानला 55 धावांवर गारद केलं होतं. तसेच ही धावसंख्या 9व्या षटकात गाठली. तीन विकेट गमवून भारताने विजयी पताका फडकावली. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. (Photo: Getty Images)