Rajat Patidar: कर्णधार म्हणून रजत पाटीदारच्या शिरपेचात मानाचा तुरा, आयपीएलमध्ये मोडला मोठा विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदारची बॅट चांगलीच तळपली. त्याने नाबाद 93 धावांची खेळी आणि संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यास मदत झाली. या सामन्यात त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: May 27, 2026 | 7:19 PM
1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने आयपीएल 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 33 चेंडूत नाबाद 93 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.  (Photo: BCCI/IPL)

2 / 5
रजत पाटीदारने गुजरात टायटन्सविरुद्ध 9 षटकार मारले. यासह आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार ठरला आहे. रजत पाटीदारने आतापर्यंत 41 षटकार मारले आहेत.  (Photo: BCCI/IPL)

3 / 5
रजत पाटीदारने श्रेयस अय्यरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये 39 षटकार मारले होते. पाटीदार या पर्वात अय्यरला धावांच्या बाबतीत मागे टाकेल अशी स्थिती आहे. पाटीदाराने 14 सामन्यात 486 धावा केल्या आहेत. तर अय्यरने या पर्वात 498 धावा केल्या आहेत. (Photo: PTI)

4 / 5
रजत पाटीदार या पर्वात सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करणारा कर्णधार ठरला आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा 196 पेक्षा अधिक आहे. पाटीदारने या पर्वात 5 अर्धशतकं ठोकली आहेत. पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबी सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवू शकतो. (Photo: PTI)

5 / 5
आरसीबीने आतापर्यंत पाचवेळा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. मागच्या पर्वात त्यांनी जेतेपदाला गवसणी घातली होती. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात प्लेऑफमध्ये सर्वात मोठा विजय मिळवण्याचा मानही आरसीबीला मिळाला आहे. राजस्थानने दिल्लीला वानखेडेवर 105 धावांनी पराभूत केलं होतं. आता आरसीबीने गुजरातला 92 धावांनी नमवलं. (Photo: PTI)

Follow Us