Rajat Patidar : रजत पाटीदारची जबाबदारी वाढली, आयपीएल चॅम्पियन कॅप्टनला आणखी एका संघाचं कर्णधारपद
Rajat Patidar Captain of Gwalior Cheetahs : रजत पाटीदार एका टीमला सलग 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरला. रजतने यासह महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांची बरोबरी केली. त्यानंतर आता रजतला आणखी एका संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. जाणून घ्या.

आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात 31 मे रोजी गुजरात टायटन्सला पराभूत करुन आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबीची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण आणि सलग दुसरी वेळ ठरली. त्यानंतर आता रजत पाटीदार याला आणखी एका संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. रजत एमपीएल (Madhya Pradesh League) स्पर्धेत नेतृत्व करताना दिसणार आहे. (Photo Credit : PTI)

रजत पाटीदार एमपीएल स्पर्धेत ग्वालियर चिता संघांच नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा 3 जून रोजी उज्जैन फाल्कन्स विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत एकूण 7 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना हा 26 जून रोजी होणार आहे. (Photo Credit : PTI)

ग्वालियर चिता टीमचा गेल्या हंगामातील प्रवास सेमी फायनलनंतर संपुष्ठात आला होता. ग्वालियर चिता टीममध्ये रजतसह आरसीबी संघातील मंगेश यादव याचा समावेश असणार आहे. (Photo Credit : PTI)

मंगेशने एमपीएलच्या गेल्या हंगामात चमकदार कामगिरी केली होती. मंगेश एकूण 14 विकेट्स मिळवल्या होत्या. मात्र मंगेशला आरसीबीकडून 19 व्या मोसमात पदार्पणाची संधी मिळाली नाही. (Photo Credit : PTI)

दरम्यान रजत पाटीदार याने नेतृत्वासह आयपीएल 2026 स्पर्धेत बॅटिंगनेही चाबूक कामगिरी केली. रजतने 19 व्या मोसमात 41 पेक्षा अधिकच्या सरासरीने 501 धावा केल्या. त्यामुळे रजत आता एमपीएल स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे आरसीबी चाहत्यांचं अधिक लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)