Major League Cricket: एकाच टी20 सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही, 5 मोठ्या विक्रमांमुळे आश्चर्य

टी20 क्रिकेटमध्ये नवे विक्रम रचणं आणि जुनं मोडणं हे आता नित्याचं झालं आहे. पण काही विक्रम आजही अभेद्य आहेत. असं असताना मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळला गेलेल्या एका टी20 सामन्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेजर क्रिकट लीग स्पर्धेतील एका सामन्यात तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली.

| Updated on: Jul 16, 2026 | 3:12 PM
1 / 5
मेजर क्रिकेट लीग स्पर्धेच्या एलिमिनेटर 1 सामन्यात धावांचा वर्षाव झाला. हा सामना वॉशिंग्टन फ्रीडम आणि  मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क यांच्यात खेळला गेला. या सामन्यात तीन फलंदाजांनी शतक ठोकलं. असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. मुंबई इंडियन्स न्यूयॉर्ककडून निकोलस पूरन, तर वॉशिंग्टन फ्रीडमकडून स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रिस गॉसने शतक ठोकलं.  (Photo: X)

मेजर क्रिकेट लीग स्पर्धेच्या एलिमिनेटर 1 सामन्यात धावांचा वर्षाव झाला. हा सामना वॉशिंग्टन फ्रीडम आणि मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क यांच्यात खेळला गेला. या सामन्यात तीन फलंदाजांनी शतक ठोकलं. असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. मुंबई इंडियन्स न्यूयॉर्ककडून निकोलस पूरन, तर वॉशिंग्टन फ्रीडमकडून स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रिस गॉसने शतक ठोकलं. (Photo: X)

2 / 5

वॉशिंग्टन फ्रीडम आणि मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क यांच्यात खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात एकूण 536 धावा झाल्या. यात वॉशिंग्टन फ्रीडमने 270, तर मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने 266 धावा केल्या. टी20 क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा आहेत. सर्वाधिक धावांचा विक्रम सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आहे. आयपीएल 2024 मध्ये दोन्ही संघांच्या मिळून 549 धावा झाल्या होत्या. (Photo: X)

3 / 5

मेजर क्रिकेट लीग 2026 स्पर्धेच्या एलिमिनेटर 1 सामन्यात एकूण 51 षटकार मारले गेले. टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कोणत्याही सामन्यात 50 हून अधिक षटकार मारले गेले आहेत. यापूर्वी आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामन्यात एकूण 42 षटकार मारले गेले होते. (Photo: X)

4 / 5

मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने एका डावात 29 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. मेजर क्रिकेट लीग स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही संघाने एका डावात मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदाने 37 षटकार, तर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने 33 षटकार मारले. तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये नेपाळे मंगोलियाविरुद्ध 27 षटकार मारले आहेत. (Photo: X)

5 / 5

मेजर क्रिकेट लीग स्पर्धेच्या एलिमिनेटर 1 सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम नोंदवला गेला. स्टीव्ह स्मिथ आणि अँड्री गॉस यांनी तिसऱ्या विकेटसाठी 241 धावांची भागादारी करत रेकॉर्ड नोंदवला. यापूर्वी सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरच्या नावावर हा विक्रम होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत या दोघांनी 213 धावांची भागीदारी केली होती. (Photo: X)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us