कुठे कमी पडला? 15 षटकार आणि 169 धावा, तरीही रिंकु सिंहला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून डावललं
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघातून रिंकु सिंहला डावलण्यात आलं आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन सामन्यात रिंकुने 37 धावा केल्या होत्या. पण आता त्याचा विचार केला गेला नाही.

रिंकु सिंह हा बेस्ट फिनिशर म्हणून गणला जातो. अनेकदा त्याने हे सिद्धही करून दाखवलं आहे. पण त्याला संघातून डावललं गेलं. पण त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात त्याची निवड झाली आणि आता पुन्हा एकदा त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. (PC-PTI)

रिंकु सिंह झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्याने दोन सामन्यात 12 आणि 25 धावांची खेळी केली होती. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून त्याला डावललं आहे. (PC-PTI)

युपी टी20 लीग स्पर्धेत रिंकु सिंहने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने मेरठसाठी 7 सामन्यात 42.25 च्या सरासरीने 19 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 219चा होता. आणि 15 षटकार मारले होते. (PC-PTI)

टी20 सामन्यात नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली गेली आहे. इतकंच काय तर अक्षर पटेल आणि शिवम दुबेला स्थान दिलं गेलं आहे. अशा स्थितीत रिंकु सिंहला टीम इंडियात जागा मिळणं कठीण आहे. (PC-PTI)

रिंकु सिंहने टीम इंडियासाठी 48 टी20 सामन्यात 36.94 च्या सरासरीने 702 धावा केल्या आहेत. त्याच्या स्ट्राईक रेट हा 156.34 चा आहे. असं असूनही त्याला डावलण्यात आलं आहे. (PC-PTI)