Shivam Dube’s Wife Anjum Khan : धर्माच्या भिंती ओलांडत शिवम दुबे लग्नबंधनात, मात्र अंजुम खान आहे तरी कोण?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 18, 2021 | 12:26 PM

अंजुम खानला अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये खूप रस आहे. हिंदी मालिकांव्यतिरिक्त तिनं संगीत अल्बममध्येही काम केलं आहे. (Shivam Dubey's Wife Anjum Khan know who is Anjum Khan)

Jul 18, 2021 | 12:26 PM
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने (Shivam Dube) धर्माच्या भिंती ओलांडत कट्टरतावाद्यांच्या मुस्कटात लावली आहे. त्याने आपली मुस्लिम मैत्रीण अंजुम खानशी (Anjum Khan) लग्न केलंय.

1 / 8
भारतीय क्रिकेटपटू शिवम दुबेनं गर्लफ्रेंड अंजुम खानसोबत 16 जुलै 2021 रोजी एका खासगी कार्यक्रमात लग्न केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती देण्यात आली. मात्र अंजुम कोण आहे हे जाणून घेण्यासाठी क्रिकेटचे चाहते उत्सुक आहेत? तर जाणून घेऊया कोण आहेत अंजुम खान.

2 / 8
मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हे जोडपं विवाहबद्ध झालंय. शिवमने त्याच्या ट्विटर हँडलवरुन लग्नाचे काही क्षण, क्षणचित्रे शेअर केले आहेत. चाहत्यांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

3 / 8
शिवम दुबे याची पत्नी अंजुम खान यूपीची रहिवासी आहे. तिनं अलीगड मुस्लिम विद्यापीठातून फाइन आर्ट्स यामध्ये पदवी संपादन केली आहे.

4 / 8
अंजुम खानला अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये खूप रस आहे. हिंदी मालिकांव्यतिरिक्त तिनं संगीत अल्बममध्येही काम केलं आहे.

5 / 8
अंजुम खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. शिवम दुबेची पत्नी अंजुम खान सौंदर्याच्या दृष्टीनं बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये.

6 / 8
शिवम दुबे आणि अंजुम खान पहिल्यांदा कधी भेटले आणि दोघांमधील जवळीक कशी वाढली हे अद्याप समोर आलेलं नाही.

7 / 8
शिवम दुबे हिंदू असून त्याची पत्नी अंजुम खान मुस्लिम आहे. ही गोष्ट अनेक लोकांना अस्वस्थ करणारी ठरली आणि सोशल मीडियावर या जोडप्याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. शिवमच्या दुवा मागण्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतला. नेटकऱ्यांनी असंही विचारले की त्यांचे लग्न झाले की निकाह?

8 / 8

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI