8 चौकार षटकार…! शुबमन गिलचा या संघात धमाकेदार डेब्यू, 21 चेंडूत ठोकल्या इतक्या धावा

Sher-E-Punjab T20 league: भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल शेर ए पंजाब टी20 लीग स्पर्धेतील पहिल्या सामन्यात खेळला. या सामन्यात त्याने जबरदस्त खेळी केली. त्याने फाजिल्का फाल्कन्सकडून खेळताना आपला आक्रमक अंदाज दाखवला.

| Updated on: Sep 07, 2026 | 8:17 PM
1 / 5
भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिलने शेर ए पंजाब टी20 लीग स्पर्धेत खेळत आपला आक्रमक अंदाज दाखवला. या लीग स्पर्धेच्या 15व्या सामन्यात फाजिल्काकूडन खेळताना गिलने आपला क्लास दाखवला.  (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिलने शेर ए पंजाब टी20 लीग स्पर्धेत खेळत आपला आक्रमक अंदाज दाखवला. या लीग स्पर्धेच्या 15व्या सामन्यात फाजिल्काकूडन खेळताना गिलने आपला क्लास दाखवला. (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

2 / 5

या सामन्यात शुबमन गिल सलामीला उतरला होता आणि लुधियाना लायन्स गोलंदाजांवर जोरदार प्रहार चढवला. त्याने 21 चेंडूत 40 केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. त्याने 190.48 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

3 / 5

डावाच्या सुरूवातीपासूनच गिलने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सेट होण्याची संधीच दिली नाही. डावाचा दुसऱ्या षटकात गिलचा सामना अर्शदीप सिंगशी झाला. त्याच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार मारले. (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

4 / 5

आक्रमक शैलीत फलंदाजी करत असताना शुबमन गिलच्या गतीला 10व्या षटकात ब्रेक लागला. फिरकीपटू कार्तिक चड्ढाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पण त्याच्या धावांच्या जोरावर फाजिल्का फाल्कन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 70 धावा केल्या. (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

5 / 5

शुबमन गिलने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत कर्णधारपद भुषवलं होतं.. या मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर धेट देशांतर्गत क्रिकेटमध्येउतरून आपली चमक कायम राहिली आहे. (PHOTO CREDIT- Sher-E-Punjab T20 league)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us