
भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका म्हणजे भारताचं टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे या मालिकेकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. असं असताना सूर्यकुमार यादव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. कारण त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळण्यास उपलब्ध असल्याचं आधीच सांगितलं आहे. (Image Credits: PTI)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार अधिकाअधिक सामने खेळण्याचा प्रयत्नात आहे. याच तयारीचा भाग म्हणून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील मुंबईचा पहिला सामना 26 नोव्हेंबर रोजी लखनौमध्ये आहे. (Image Credits: PTI)

सूर्यकुमार यादव 6 आणि 8 डिसेंबर रोजी शेवटच्या दोन लीग सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी20 सामना 9 डिसेंबर रोजी आहे. मुंबईचे केरळ, रेल्वे, विदर्भ, आंध्र, आसाम, छत्तीसगड आणि ओडिशा विरुद्ध लीग सामने आहेत. (Image Credits: PTI)

सूर्यकुमारने या वर्षाच्या सुरुवातीला विदर्भाविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात मुंबईकडून शेवटचा सामना खेळला होता. आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. पण त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी इतर कोणत्याही फॉर्मेटमध्ये खेळणार नाही हे स्पष्ट केलं आहे. (Image Credits: PTI)

सूर्यकुमार यादव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपला फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील चांगल्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याचा आत्मविश्वास वाढेल. (Image Credits: PTI)