अश्विनची ‘तारीख पे तारीख’, 52 वी टी ट्वेन्टी विकेट घेण्यासाठी जवळपास 4 वर्ष, वाट पाहता पाहता धोनी मेन्टॉर बनला!

बुधवारी, आर अश्विन 1577 दिवसांनंतर निळ्या जर्सीमध्ये दिसला आणि चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याने पहिली विकेट घेतली. अश्विनने अफगाणिस्तानचा फलंदाज गुलबदिन नायबला एलबीडब्ल्यू करून त्याची टी ट्वेन्टी फॉरमॅटमधील विकेट्सची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली.

1/4
टी-20 वर्ल्ड कपमध्ये बुधवारी टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात मैदानात उतरली. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचाच होता. या विजयासाठी बुधवारी भारताने आपला अनुभवी गोलंदाज आर अश्विनला संघात संधी दिली.

2/4
आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने मिस्ट्री बॉलर वरुण चक्रवर्तीला स्थान दिले होते, जरी तो काही विशेष करू शकला नाही. बुधवारी झालेल्या दुखापतीनंतर अश्विनला त्याच्या जागी संधी देण्यात आली. अश्विनला तब्बल चार वर्षांनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियात संधी देण्यात आली.

3/4
बुधवारी, आर अश्विन 1577 दिवसांनंतर निळ्या जर्सीमध्ये दिसला आणि चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याने पहिली विकेट घेतली. अश्विनने अफगाणिस्तानचा फलंदाज गुलबदिन नायबला एलबीडब्ल्यू करून त्याची टी ट्वेन्टी फॉरमॅटमधील विकेट्सची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. नायबने 20 चेंडूत 18 धावा केल्या. त्याला अश्विनने बाद केलं.

4/4
बुधवारच्या सामन्यापूर्वी, अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेतली होती. हा सामना 28 ऑगस्ट 2016 रोजी झाला होता. त्यावेळी संघाचा कर्णधार एमएस धोनी होता. आज धोनी चार वर्षांपासून संघाचा मार्गदर्शक आहे आणि अश्विन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI