Indian Cricketer Wife: रोहित, विराट की धोनी? तिघांपैकी कुणाची पत्नी सर्वात श्रीमंत?

Indian Cricketers Wife Net Worth: टीम इंडियाच्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दिग्गज क्रिकेटपटूंची कमाई किती आहे, याबाबत अनेक चाहत्यांना उत्सुकता असते. मात्र त्यांच्या पत्नींची कमाई किती आहे? हे माहित आहे का?

Sanjay patil | Updated on: Jun 18, 2024 | 7:55 PM
1 / 6
टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना जाहिरात, वार्षिक करार आणि इतर माध्यमातून होणाऱ्या कमाईची कायम चर्चा असते. मात्र आज आपण क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या संपत्तीबाबत जाणून घेऊयात. आपण महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट या कोहली या तिघांच्या पत्नींच्या कमाईबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना जाहिरात, वार्षिक करार आणि इतर माध्यमातून होणाऱ्या कमाईची कायम चर्चा असते. मात्र आज आपण क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या संपत्तीबाबत जाणून घेऊयात. आपण महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट या कोहली या तिघांच्या पत्नींच्या कमाईबाबत जाणून घेऊयात.

2 / 6

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही अभिनेत्री आहे. अनुष्काने लग्नानंतर बॉलिवूडपासून फारकत घेतली. मात्र त्यानंतरही अनुष्का कोटींची कमाई करते. अनुष्का प्रोडक्शन हाउस आणि क्लोदिंग ब्रँडची मालकीन आहे . तसेच अनुष्का एका जाहिरातीसाठी 3 कोटी आकारते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्काची एकूण संपत्ती ही 255 कोटी आहे.

3 / 6

टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह ही कायम सामन्यांना हजेरी लावते. मात्र ती स्पोर्ट्स मॅनेजर आहे. रितिका या माध्यमातून कमाई करते.

4 / 6

रितिकीची संपत्ती किती? असा प्रश्न अनेकांना आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रितिका 10 कोटींची मालकीन आहे.

5 / 6

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी ही देखील कोटींची कमाई करते. साक्षी धोनी ही फिल्म प्रोडक्शन कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साक्षीची एका रियल इस्टेट फर्ममध्ये 25 टक्के भागीदारी आहे.

6 / 6

तसेच साक्षीचं नेटवर्थही कोटींच्या घरात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीच्या पत्नीची कमाई ही 50 कोटींच्या घरात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us