
टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन याने चाहत्यांना अखेर गूड न्यूज दिली आहे. शिखर आणि त्याची प्रेयसी सोफी शाईन हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, शिखर-सोफी फेब्रुवारीत लग्न करणार आहेत. (Photo Credit: PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखर आणि सोफी फेब्रुवारीतील तिसऱ्या आठवड्यात लग्न बंधनात अडकणार आहेत. लग्नाचं आयोजन हे दिल्ली-एनसीएआरमध्ये करण्यात येणार आहे. (Photo Credit: PTI)

मिळालेल्या माहितीनुसार, शिखर आणि सोफी या दोघांच्या लग्नात क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी उपस्थितीत असणार आहेत. त्यासाठी आता तयारी सुरु झाली आहे. (Photo Credit: PTI)

शिखर आणि सोफी गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघेही पहिल्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सामन्यात एकत्र दिसले होते. तेव्हापासून दोघांमधील जवळीक वाढली. (Photo Credit: PTI)

धवनचं हे दुसरं लग्न असणार आहे. धवनचं पहिल लग्न हे मोडलंय. शिखर आणि आयशा मुखर्जी या दोघांचा 2023 साली घटस्फोट झाला होता. शिखर आणि आयशा या दोघांना एक अपत्य आहे. (Photo Credit: PTI)