European T20 Premier League स्पर्धेत पहिल्या हॅटट्रीकची नोंद, टॉम करनने रचला इतिहास
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टॉम करन याने युरोपियन टी20 प्रीमियर लीग स्पर्धेत कमाल केली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात हॅटट्रीक नोंदवली आहे. यासह त्याच्या नावावर ऐतिहासिक नोंद झाली आहे.

युरोपियन टी20 प्रीमियर लीग स्पर्धेचं पहिलं पर्व सुरू आहे. या लीग स्पर्धेत 2 सप्टेंबरला एडिनबर्ग कॅशल रॉकर्स आणि बेलफास्ट वोल्ब्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात एडिनबर्ग कॅशन रॉकर्सने बेलफास्ट वोल्ब्लसा 59 धावांनी पराभूत केलं. या विजयात टॉम करनची हॅटट्रीक महत्त्वाची ठरली.(Photo: Getty/ETPL)
इंग्लंड अष्टपैलू खेळाडू टॉम करन युरोपियन टी20 प्रीमियर लीग स्पर्धेत हॅटट्रीक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने बेलफास्टच्या फ्रेड क्लासेन, मॅथ्यू हम्फरेज आणि मार्क अडायर यांना बाद केलं. टॉम करनने दोन षटकात ही हॅटट्रीक पूर्ण केली. टॉम करनने 16व्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट काढली. त्यानंतर 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट काढत हॅटट्रीक पूर्ण केली. (Photo: Getty/ETPL)
युरोपियन टी20 प्रीमियर लीग स्पर्धेत पहिली हॅटट्रीक घेत त्याने एकूण 4 विकेट घेतल्या. त्याने 3.1 षटकात 17 धावा देत 4 विकेट काढल्या. एडिनबर्ग कॅशल रॉकर्ससाठी फलंदाजीतही योगदान दिलं. मात्र इतकं करून त्याला सामनावीराचा पुरस्कार काही मिळाला नाही. त्याच्या ऐवजी या सामन्यात 98 धावांची खेळी करणाऱ्या जेजे स्मट्स याला पुरस्कार दिला गेला. (Photo: Getty/ETPL)
टॉम करनचं क्रिकेटचं एक नातं आहे. त्याची नाळ क्रिकेटशी जोडली गेली आहे. कारण त्याचे आजोबा, वडील आणि भाऊही क्रिकेटपटू आहेत. टॉम करनच्या आजोबा आणि वडिलांनी झिम्बाब्वेसाठी क्रिकेट खेळलं आहे. त्याचा एक भाऊ झिम्बाब्वेसाठी खेळतो. तर एक भाऊ म्हणजेच सॅम करन इंग्लंड संघाकडून खेळतो. (Photo: Getty/ETPL)
एडिनबर्स कॅशन रॉकर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 189 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बेलफास्ट वोल्ब्स 17.1 षटकात 130 धावा करून सर्व बाद झाले. या सामन्यात सहमालक आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 35 धावा केल्या. (Photo: Getty/ETPL)