IPL : वेगवान 50 विकेट्स घेणारे टॉप 5 फिरकीपटू, भारताच्या दोघांचा समावेश, नंबर 1 कोण?

Fastest 50 Wickets In IPL By Spinners : नूर अहमद याने 13 एप्रिलला केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याला आऊट केलं. नूरने यासह आयपीएल स्पर्धेत विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलं. नूरने यासह मानाच्या यादीत स्थान मिळवलं.

| Updated on: Apr 15, 2026 | 7:50 PM
1 / 5
अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू नूर अहमद आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व करत आहे. नूरने मंगळवारी 14 एप्रिलला केकेआर विरुद्ध सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. नूर यासह आयपीएल स्पर्धेत वेगवान 50 विकेट्स मिळवणारा  पाचवा फिरकीपटू ठरला. यानिमित्ताने आयपीएल स्पर्धेत वेगवान 50 विकेट्स मिळवणाऱ्या इतर 4 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

2 / 5
आयपीएल स्पर्धेत वेगवान 50 विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत युझवेंद्र चहल चौथ्या स्थानी आहे. चहलने 40 सामन्यांमध्ये विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. चहल या स्पर्धेतील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी 1 आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
माजी फिरकीपटू अमित मिश्रा तिसऱ्या स्थानी आहे. अमितने 37 सामन्यांमध्ये 50 विकेट्स मिळवल्या होत्या. अमितने आयपीएल कारकीर्दीत हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI)

4 / 5
दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहीर याने अमित मिश्राच्या तुलनेत 2 सामन्यांआधी 50 विकेट्स मिळवल्या. इम्रानने 35 टी 20 सामन्यांमध्ये 50 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : IPL)

5 / 5
वेस्ट इंडिजचा माजी फिरकीपटू सुनील नारायण याच्या नावावर आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान 50 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. सुनीलने 32 सामन्यांमध्ये 50 विकेट्स मिळवल्या होत्या. सुनील कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करत आहे. (Photo Credit : News 9)

Follow Us