FIFA World Cup 2026: मेस्सी-रोनाल्डो यांच्यात लढत कधी? दोघांचा शेवटचा वर्ल्डकप असण्याची शक्यता
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यावेळी 48 संघ स्पर्धेत जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता आहे. असं असताना फुटबॉलप्रेमींना मेस्सी आणि रोनाल्डो यांचा सामना पाहण्याची आतुरता आहे. चला जाणून घेऊयात अर्जेंटिना आणि पोर्तुगाल हे संघ कधी आमनेसामने येतील ते...

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. यंदा जेतेपदाच्या शर्यतीत 48 संघ आहेत. त्यामुळे यावेळी चुरस आणखी असणार आहे. तसेच इतक्या संघांना मागे टाकून जेतेपद कोण मिळवणार? याची उत्सुकता आहे. त्यात मेस्सी आणि रोनाल्डा यांचा सामना पाहण्याची आतुरता अधिक आहे. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने कधी येणार? असा प्रश्न आहे. म्हणजेच पोर्तुगाल आणि अर्जेंटिना यांच्यात लढत कधी होणार आहे? तर हे दोन दिग्गज 11 जुलैला आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यासाठी एक समीकरण जुळून येणं आवश्यक आहे. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळे या गटात आमनासामना होणारच नाही. पण आपल्या गटात टॉपला राहिले तर 11 जुलैला होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत हे दोन संघ भिडण्याची शक्यता आहे. (Photo: Getty Images)

पोर्तुगाल आणि अर्जेंटिना हा सामना म्हणजे मेस्सी विरुद्ध रोनाल्डो.. कारण दोघे दिग्गज खेळाडू आहेत. तसेच दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे. साखळी फेरीच्या सामन्यासाठी अर्जेंटिना जे गटात, तर पोर्तुगाल के गटात आहे. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत उतरताच मेस्सी आणि रोनाल्डो एक नवा विक्रम रचतील. दोघांचा हा सहावा वर्ल्डकप असणार आहे. तसेच शेवटचा वर्ल्डकप असण्याची शक्यता आहे. कारण दोघांचं वय झालं आहे. त्यामुळे 11 जुलैला आमनेसामने आले तर त्या सामन्याचं महत्त्व आणखी वाढेल. (Photo: Getty Images)