फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार

FIFA World Cup Awards: गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या सांगता स्पेनच्या विजयाने झाली आहे. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटीनाचा धुव्वा उडवला आणि जेतेपद मिळवलं. या स्पर्धेतील पाच मानाचे पुरस्कार कोणाला मिळाले माहिती आहेत का? चला जाणून घेऊयात..

| Updated on: Jul 20, 2026 | 2:11 PM
1 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर स्पेनने मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटीनाचा 1-0 ने धुव्वा उडवला आणि जेतेपद पटकावलं. स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फेरन टॉरेस.. त्याने अतिरिक्त वेळेत एक गोल मारला आणि विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी फेरन टॉरेसला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. (Photo: PTI)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर स्पेनने मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटीनाचा 1-0 ने धुव्वा उडवला आणि जेतेपद पटकावलं. स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फेरन टॉरेस.. त्याने अतिरिक्त वेळेत एक गोल मारला आणि विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी फेरन टॉरेसला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. (Photo: PTI)

2 / 5

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं गोल्डन बूटचा मानकरी ठरला तो फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे.. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 10 गोल मारले. तसेच 4 गोल मारण्यासाठी त्याची मदत झाली. त्यामुळे त्याला या पुरस्काराने गौरविण्यात आलं. (Photo: PTI)

3 / 5

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या गोल्डन बूटचा मानकरी ठरला तो स्पेनचा कर्णधार रॉड्री.. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केल्याने त्याला पुरस्काराने गौरविण्यात आलं. रॉड्रीने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. रॉड्री स्पेनचा कर्णधार आहे. (Photo: PTI)

4 / 5

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत गोल्डन ग्लव्ह्सचा मानकरी स्पेनचा गोलकीपर उनाई सिमोन ठरला. त्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. उनाइ सिमोनने या स्पर्धेत फक्त एकच गोल दिला. त्याच्या अभेद्य किल्ल्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना खूपच अडचण झाली. (Photo: PTI)

5 / 5

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत बेस्ट यंग प्लेयरचा पुरस्कार स्पेनच्या पाउ कुबारसीला मिळाला. स्टार डिफेंडर असलेल्या कुबारसीने स्पेनच्या 8 सामन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषकाच्या इतिहासात हा पुरस्कार जिंकणारा पहिलाच डिफेंडर ठरला आहे. अवघ्या 19 वर्षे आणि 178 दिवसांचा असलेला कुबारसीने हा पुरस्कार मिळवला. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us