Will Jack : विल पावर, इंग्लंडच्या फलंदाजाचा कारनामा, वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंकेत टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या पर्वाचा थरार सुरु आहे. या स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदाच असा प्रकार झाला आहे. इंग्लंडच्या विल जॅक्स याने वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

रेहान अहमद आणि विल जॅक्स या जोडीने फटकेबाजी करुन शुक्रवारी सुपर 8 मधील सामन्यात न्यूझीलंडवर मात केली. इंग्लंडने यासह सलग तिसरा सामना जिंकून ए ग्रुपमधील टेबल टॉपर ठरण्याचा बहुमान मिळवला. विलने या सामन्यात ऑलराउंड कामगिरी केली. विलने 18 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. तर त्याआधी न्यूझीलंडच्या 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचारस्ता दाखवला. (Photo Credit : PTI)

विल जॅक्स याने केलेल्या या कामगिरीसाठी त्याचा सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरव करवण्यात आला. विलने यासह टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. विलने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 4 वेळा POTM पुरस्कार जिंकण्याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन याच्या विक्रमाची बरोबरी केली. (Photo Credit : PTI)

विल जॅक्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 4 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसन याने सर्वातआधी 2012 साली टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 4 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याचा बहुमान मिळवला होता. (Photo Credit : PTI)

विलने यासह आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विल इंग्लंडसाठी सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विलने याबाबत केविन पीटरसन, ल्यूक राईट, जोस बटलर आणि आदिल रशीद या चौघांना मागे टाकलं आहे. या चौघांनी 3 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

दरम्यान विल जॅक्सने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. विलने 7 सामन्यांमध्ये 63.66 च्या सरासरीने आणि 176.85 च्या स्ट्राईक रेटने 191 धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर विलने बॉलिंगनेही चमक दाखवलीय. विलने 7 विकेट्सही मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)