AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens Asia Cup 2025 : टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरुच, सिंगापूरचा 12-0 ने धुव्वा, सूपर 4 मध्ये धडक

Indian Women Hockey Team : नवनीत कौर आणि मुमताज खान या दोघींनी सिंगापूर विरूद्धच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. नवनीत कौर आणि मुमताज खान या दोघींनी केलेल्या प्रत्येकी 3-3 गोलमुळे भारताने सिंगापूरवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. भारताने या विजयासह सुपर 4 मध्ये धडक दिली आहे.

| Updated on: Sep 08, 2025 | 7:19 PM
Share
हॉकी आशिया कप स्पर्धेत मेन्स आणि वूमन्स या दोन्ही संघांनी धमाका केला आहे. मेन्स टीम इंडियाने हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात तब्बल 8 वर्षांनी नाव कोरलं. भारताने गतविजेत्या कोरियावर मात करत आशिया कप जिंकण्याची प्रतिक्षा संपवली. त्यानंतर वूमन्स हॉकी टीम इंडियाने विजयी झंझावात यशस्वीरित्या सुरु ठेवला आहे. वूमन्स टीम इंडियाने सिंगापूरवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने सिंगापूरवर 12-0 अशा फरकाने विजय मिळवला. (Photo Credit : X/Hockey India)

1 / 5
भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून देण्यात दोघींनी निर्णायक भूमिका बजावली. नवनीत कौर आणि मुमताज खान या दोघींनी प्रत्येकी 3-3 गोल केले. विशेष म्हणजे या दोघींनी गोल करण्याची हॅटट्रिक केली. नवनीतने  14 व्या, 18 व्या आणि 28 व्या मिनिटाला गोल केला. तर मुमताज खान हीने दुसऱ्या, 32 व्या आणि 38 व्या मिनिटाला गोल केला. (Photo Credit : X/Hockey India)

2 / 5
नवनीत आणि मुमताज या दोघींव्यतिरिक्त नेहाने 2 गोल केले. नेहाने 11 आणि 38 व्या मिनिटाला गोल केला.  तसेच स्ट्रायकर लालरेम्सियामी हीने 13 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी आणखी मजूबत करण्यात योगदान दिलं. तसेच शर्मिला देवी आणि ऋतुजा पिसळ या दोघींनी प्रत्येकी 1-1 गोल केला. भारताने अशाप्रकारे 52 व्या मिनिटाला 12-0 अशी आघाडी घेतली. (Photo Credit : X/Hockey India)

3 / 5
भारताने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात थायलंडवर 11-0 ने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर भारताने  जपान विरूद्धचा सामना 2-2 ने बरोबरीत सोडवला. वूमन्स टीम इंडिया आता  सुपर 4 मध्ये खेळणार आहे. भारतासमोर या सामन्यात ए ग्रुपमधील दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संघाचं आव्हान असणार आहे. (Photo Credit : X/Hockey India)

4 / 5
वूमन्स आशिया कप स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले. या संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं. दोन्ही गटातील 2 अव्वल संघ सुपर 4 फेरीत पोहचतील. सुपर 4 मधील 2 अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. आशिया कप जिंकणारा संघ बेल्जियम-नेदरलँडमध्ये होणाऱ्या एफआयएच वूमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरेल. त्यामुळे अंतिम सामन्यात दोन्ही संघांत चुरस पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : X/Hockey India)

5 / 5
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.