‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळ्यात रेड कार्पेटवर कलाकारांचा जबरदस्त लूक

नेहमी मालिकेत एका अंजादात दिसणाऱ्या या कलाकारांचा पुरस्कार सोहळ्यातील स्टायलिश लूक विशेष चर्चेत राहिला. येत्या 15 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ही पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

| Updated on: Mar 10, 2026 | 11:25 AM
1 / 6
कलाकार आणि प्रेक्षक वर्षभर ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात तो 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026' नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. स्टार प्रवाह परिवाराचा हा बहुप्रतीक्षित सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नसून, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साजरा करणारा आनंदाचा उत्सव असतो.

कलाकार आणि प्रेक्षक वर्षभर ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात तो 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026' नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. स्टार प्रवाह परिवाराचा हा बहुप्रतीक्षित सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नसून, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साजरा करणारा आनंदाचा उत्सव असतो.

2 / 6

यंदाच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या कलाकारांनी, त्यांच्या कुटुंबियांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. स्टार प्रवाह परिवार सोहळ्याच्या रेड कार्पेट थीमची नेहमीच विशेष चर्चा असते.

3 / 6

यंदा या सोहळ्याची थीम होती ‘वेस्टर्न आउटफिट’ आणि या थीमनुसार कलाकारांनी एकापेक्षा एक आकर्षक आणि स्टायलिश पोशाख परिधान करत रेड कार्पेटवर आगळावेगळा ठसा उमटवला.

4 / 6

ग्लॅमरस गाऊन्स, स्टायलिश सूट्स आणि ट्रेंडी जॅकेट्समध्ये सजलेल्या कलाकारांनी रेड कार्पेटवर दिमाखात एण्ट्री घेतली. एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या कलाकारांना आपण त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये पाहत असतो.

5 / 6

मात्र स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा एक वेगळाच, स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

6 / 6

15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026’ हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवणार, कोणते परफॉर्मन्सेस प्रेक्षकांची मनं जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us