सौंदर्य क्वीन, सुखदा खांडकेकरच्या गणपती लुकवर चाहते फिदा, सौंदर्याचं होतंय प्रचंड कौतुक
गणेशोत्सवासाठी सुखदा खांडकेकरचा इंद्रधनुषी पैठणीमध्ये सुंदर पारंपरिक लूक. पैठणीत अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य. फोटो पाहून सर्वजण करत आहेत कौतुक.

मराठी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिचा गणेशोत्सवानिमित्त खास पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुखदाने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले असून तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गणेशोत्सवासाठी सुखदाने खास इंद्रधनुषी पैठणी साडीची निवड केली आहे. लाल, हिरवा, नारंगी आणि जांभळा अशा विविध रंगांचा सुरेख मेळ असलेल्या या पैठणीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
पारंपरिक साडी आणि साध्या पण आकर्षक दागिन्यांमुळे सुखदाचा लूक विशेष उठून दिसत आहे. या पारंपरिक वेशभूषेला तिने नाजूक मंगळसूत्र, सुंदर झुमके आणि हिरव्या-सोनेरी बांगड्यांची साथ दिली आहे.
सुखदाने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. तिच्या इंद्रधनुषी पैठणीतील या सुंदर अंदाजाचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत.