
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी निधन झालं. 53 वर्षीय संजय हा सोना कॉमस्टारचा सीईओ होता. त्याचा कोट्यवधींचा व्यवसाय होता. आता संजयच्या निधनानंतर त्याचा हा व्यवसाय कोण सांभाळणार असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.

2024 मध्ये सोना कॉमस्टार कंपनीचं मूल्य 4.7 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 39000 कोटी रुपये होतं. हा आकडा योग्य आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

'बॉलिवूड लाइफ'च्या रिपोर्टनुसार संजय कपूरचा हा बिझनेस आता त्याच्या दोन्ही बहिणी सांभाळू शकतात. सुपर्णा कपूर मोटवाने ही मॅगझिन एडिटर आहे. तर दुसरी बहीण मंदिरा कपूर कोयराला ही सोना मंदिरा प्रायव्हेट लिमिटेडची सहसंस्थापक आहे. ही कंपनी ऑटो कम्पोनंट्स बनवते.

संजय कपूरची कंपनी सोना कॉमस्टार इलेक्ट्रिक व्हेइकल कम्पोनंट्सचा पुरवठा करते. भारत, अमेरिका आणि चीनमध्ये त्याचा पुरवठा होतो.

संजयने तीन लग्न केले आहेत. त्याची पहिली पत्नी डिझायनर नंदिता होती. त्यानंतर त्याने अभिनेत्री करिश्मा कपूरशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांना दोन मुलं आहेत. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर त्याने प्रिया सचदेवशी लग्न केलं.