Surya Nakshatra Parivartan 2026 : सूर्याची बदलणार चाल, या तीन राशींची चांदीच, 17 ऑगस्टपर्यंत …
Surya Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, सूर्याचे नवीन नक्षत्रात होणारे संक्रमण अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. आता सूर्य 'आश्लेषा' नक्षत्रात प्रवेश करत आहे. बुध ग्रहाची अधिपती असलेल्या या नक्षत्रातील प्रवेशामुळे अनेक राशींचे नशीब उजळणार आहे. कोणकोणत्या राशींना याचा लाभ होईल, चला जाणून घेऊया.

Surya Nakshatra Parivartan 2026: आज सूर्यदेव आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करतील. या नक्षत्राचे स्वामी बुध देव आहेत. या नक्षत्रात सूर्य 17 ऑगस्टपर्यंत राहतील आणि त्यानंतर ते मघा नक्षत्रात प्रवेश करतील. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यदेवांचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण सूर्याला आत्मा, मान-सन्मान आणि यशाचा कारक मानले जाते. तर बुध ग्रह बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि व्यापाराचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा आत्म्याचे कारक सूर्य ग्रह बुद्धीचे कारक बुध यांच्या नक्षत्रात प्रवेश करतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तींच्या आर्थिक स्थितीवर, संवादशैलीवर आणि कार्यक्षमतेवर होतो.

या नक्षत्र परिवर्तनामुळे राशिचक्रातील 3 विशेष राशींना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus) - वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन उत्पन्नाच्या दृष्टीने अतिशय शुभ ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीसोबतच इन्सेंटिव्ह किंवा बोनसचा लाभ मिळू शकतो. दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास (Virgo) - कन्या राशीचे स्वामी स्वतः बुध देव आहेत, त्यामुळे सूर्याचा बुधाच्या नक्षत्रात प्रवेश तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नसेल. जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित असाल, तर एखादी मोठी आणि फायदेशीर डील निश्चित होऊ शकते. शेअर बाजार किंवा मालमत्तेमध्ये केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या प्रतिभेचे कौतुक करतील.

धनु रास (Sagittarius) - धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ भाग्याची पूर्ण साथ घेऊन येणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याचे योग निर्माण होतील, ज्यामुळे तुमची बचत वाढू शकते. तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा योग्य काळ आहे; यश मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे काम अधिक सोपे होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)