त्यापेक्षा मी रिटायर होईन…, तापसी पन्नूचं मोठं वक्तव्य; थेट कियाराला लगावला टोला?

Taapsee Pannu: आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने नुकत्याच एका मुलाखतीत चित्रपटांच्या निवडीबद्दल तिचं मत मांडलं आहे. यावेळी तिने कियारा आणि यशच्या 'टॉक्सिक'वर निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय.

| Updated on: Sep 03, 2026 | 9:34 AM
1 / 5
Taapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आपल्या अभिनय कारकिर्दीत तिने अनेकदा वेगळ्या धाटणीच्या आणि आशयपूर्ण भूमिका निवडल्या आहेत. आता तापसीने सध्याच्या हिंदी सिनेमाच्या बदलत्या ट्रेंडवर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Taapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आपल्या अभिनय कारकिर्दीत तिने अनेकदा वेगळ्या धाटणीच्या आणि आशयपूर्ण भूमिका निवडल्या आहेत. आता तापसीने सध्याच्या हिंदी सिनेमाच्या बदलत्या ट्रेंडवर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

2 / 5

हल्लीच्या चित्रपटांमध्ये वाढलेली हिंसा आणि ‘शॉक व्हॅल्यू’ पाहून आपण अशा प्रकारच्या चित्रपटांचा भाग होण्यापेक्षा निवृत्ती स्वीकारू, असं तापसीने म्हटलं आहे. तापसी सध्या तिच्या आगामी ‘गांधारी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान पत्रकार आणि फिल्म क्रिटिक सुचिन मेहरोत्रासोबतच्या मुलाखतीत तिला 2015 च्या आसपासच्या हिंदी चित्रपटांपासून आताच्या चित्रपटांपर्यंत झालेल्या बदलाबद्दल विचारण्यात आलं.

3 / 5

यावर तापसीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल समाधान व्यक्त केलं. तिने सांगितलं की, ज्या काळात तिने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला, त्या वेळी विविध प्रकारचे चित्रपट बनत होते. त्यामुळे तिच्यासारख्या अभिनेत्रीला त्या काळात करिअर करण्याची संधी मिळाली, हे आपलं भाग्य असल्याचं तिने म्हटलं. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे पाहताना तिने कुटुंबीयांशीही याबाबत चर्चा केली.

4 / 5

सध्याच्या सिनेमांचा ट्रेंड पाहून तापसीने मिश्कीलपणे, ‘कुठे रिटायर होण्याची वेळ तर आलेली नाही ना?’ असा प्रश्न स्वतःलाच विचारल्याचं सांगितलं. त्यानंतर तिने अशा प्रकारचे सिनेमे करण्यापेक्षा निवृत्त होणं पसंत करेन, असं स्पष्ट केलं. मात्र, अशा चित्रपटांना त्यांचा स्वतःचा प्रेक्षकवर्ग असू शकतो, हेही तिने मान्य केलं आहे. तापसीने पुढे सांगितलं की, तिला अभिनयाचं काम खूप आवडतं; पण केवळ काम मिळतंय म्हणून कोणताही प्रोजेक्ट स्वीकारण्याची तिची इच्छा नाही. तिच्यासाठी फिल्मोग्राफी महत्त्वाची आहे.

5 / 5

आज एखादा ट्रेंड लोकप्रिय असला तरी भविष्यात तो बदलू शकतो; मात्र कलाकाराने केलेले सिनेमे त्याच्या कारकिर्दीचा कायमचा भाग राहतात, असं मत तिने मांडलं आहे. याच मुद्द्यावर तापसीने सांगितलं की, "दहा वर्षांनंतर एखाद्याने तिच्या फिल्मोग्राफीकडे पाहिलं, तर माझ्या कामाची किंवा माझ्याशी जोडलेल्या लोकांची लाज वाटू नये, अशी माझी इच्छा आहे." याच काळात यश आणि कियारा अडवाणी यांच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटातील हिंसा, बोल्डनेस आणि काही दृश्यांवरून चर्चा सुरू असल्याने तापसीच्या वक्तव्याचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us