
टीव्हीचा पॉपुलर कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीच्या रोलमध्ये दिसते. याआधी नेहा मेहता ही भूमिका करायची. तिचा रोल प्रेक्षकांना खूप आवडलेला.

नेहा मेहताने हिंदी टेलीविजन सोबत गुजराती सिनेमात सुद्धा काम केलय. पण तिला ओळख खऱ्या अर्थाने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो मुळे मिळाली. या शो मुळे ती घरा-घरात प्रसिद्ध झाली. आता ती भले या शो चा हिस्सा नसेल. पण आजही प्रेक्षक तिला अंजली मेहताच्या नावाने ओळखतात.

वर्ष 2008 मध्ये जेव्हा हा शो सुरु झाला, तेव्हा ती या शो मध्ये सहभागी झाली. जवळपास 12 वर्ष काम केल्यानंतर 2020 साली नेहा मेहताने हा शो सोडला. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सोडल्यानंतर आता ती काय करते? हे तुम्हाला माहित आहे का?.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो सोडल्यानंतर नेहा मेहताने थिएटरमध्ये पुनरागमन केलं. सप्टेंबर 2023 मध्ये तिने हिंदी नाटक 'दिल अभी भरा नहीं' मध्ये वैदेहीची भूमिका साकारली. 12 वर्षानंतर नाटकाच्या स्टेजवर येत असल्याच तिने सांगितलं होतं.

थिएटर एका कलाकारासाठी आवश्यक असल्याच नेहाने म्हटलं होतं. निश्चित ती टीव्हीवर परतणार आहे. पण सध्या तिचं लक्ष थिएटरवर आहे. तारक मेहता शो मध्ये तिची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना भरपूर आवडायची.