CM Vijay : विजय यांनी एकादगडात मारले दोन पक्षी, काँग्रेसला खुश केलं त्याचवेळी भाजपशी पण थेट पंगा टाळला

CM Vijay : अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय हळूहळू मुरब्बी राजकारण्यांसारखे निर्णय घेऊ लागले आहेत. त्यांनी नुकताच एक असा निर्णय घेतलाय, त्यात एका दगडात दोन पक्षी मारेल आहेत.

| Updated on: Jun 05, 2026 | 7:21 AM
1 / 5
तामिळनाडूच्या राजकारणात जनतेने थलपती विजय यांच्या पक्षाच्या बाजूने कौल दिला. फक्त बहुमतासाठी काही जागा कमी पडत होत्या. त्यावेळी काँग्रेस पक्ष पाठिंबा देण्यासाठी तयार झाला. द्रमुक सोबत अनेक वर्षांपासून असलेल्या मैत्रीचा विचार न करता काँग्रेसने विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला.

2 / 5
तामिळनाडूत थलपती विजय यांच्या TVK पक्षाचं सरकार टिकून राहण्यासाठी काँग्रेसच्या पाच आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. विजय यांनी काँग्रेस सोबतची आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी त्यांनी तामिळनाडूतील राज्यसभेची एक जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आहे.

3 / 5
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तामिळनाडूचे इन-चार्ज गिरीश चोडनकर यांनी विजय यांची भेट घेतल्यानंतर राज्यसभेच्या जागेबाबत घोषणा करण्यात आली. काँग्रेस तामिळनाडूतून राज्यसभेच्या जागेवर प्रवीण चक्रवर्ती यांना संधी देऊ शकते.

4 / 5
काँग्रेस-TVK आघाडी आकाराला आणण्यात प्रवणी चक्रवर्ती यांनी महत्वाची भूमिका बजावली. निवडणूक जिंकल्यानंतर विजय यांनी आतापर्यंत जे निर्णय घेतलेत, त्यांची जी कृती आहे, त्यात विजय यांची सर्व समावेशकतेची भूमिका दिसते. अण्णाद्रमुकचे नेते सीव्ही शनमुगन यांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडूतून राज्यसभेची एक जागा रिकामी झाली आहे.

5 / 5
द्रमुकने थलपती विजय यांच्या TVK पक्षाच्या या निर्णयावर टीका केली आहे. संसदेत TVK ला थेट भाजपशी सामना टाळायचा आहे. पण त्यांनी ही जबाबदारी काँग्रेसवर टाकली आहे असं द्रमुक नेते सर्वानन म्हणाले. टीव्हीकेच्या नेत्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय लढाईपेक्षा आघाडी भक्कम करणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे.

Follow Us