प्रसिद्ध अभिनेत्री होणार राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांची नातसून; दिवाळीनिमित्त प्रेमाची जाहीर कबुली

अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दोघांनी एकत्र एण्ट्री केली, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. आता ताराने वीरसोबतचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Oct 15, 2025 | 9:45 AM
1 / 6
प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता वीर पहारिया यांनी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र हजेरी लावली. त्यानंतर ताराने इन्स्टाग्रामवर वीरसोबतचे रोमँटिक फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

2 / 6
एकमेकांना मिठी मारतानाचे, किस करतानाचे त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. 'स्काय फोर्स' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

3 / 6
'काल रात्री माझ्या फटाक्यासोबत..' असं मजेशीर कॅप्शन देत ताराने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघंही दिवाळी पार्टीसाठी सुंदर पोशाखात तयार झाल्याचं पहायला मिळत आहे. चाहत्यांनी तारा आणि वीरच्या जोडीवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 6
याआधी सोशल मीडियावर दोघांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. ताराने गायक एपी ढिल्लनसोबत फोटो पोस्ट केला होता. त्यावर वीर पहाडियाने 'माझी' अशी कमेंट करत हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता.

5 / 6
दुसरीकडे तारानेही 'माझा' असं लिहिलं होतं. यावरून दोघांनीही त्यांचं नातं जगजाहीर करायचं ठरवलंय, हे नेटकऱ्यांच्या लक्षात आलं होतं. याआधी तारा कपूर कुटुंबातील सदस्य आदर जैनला डेट करत होती. तर वीर पहारिया अभिनेत्री सारा अली खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

6 / 6
वीर पहारिया हा स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचा मोठा भाऊ शिखर पहारिया हा अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आहे.