TATA च्या या कारला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद; एका झटक्यात विकल्या गेल्या 70,000 हून जास्त कार, किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल चकित
बाजारात एकीकडे XUV गाड्यांची क्रेझ वाढत असताना दुसरीकडे छोट्या फॅमिली कारची मागणीही कायम असल्याचं दिसतं आहे. याचाच प्रत्यय टाटा मोटर्सच्या टियागो या हॅचबॅक कारच्या विक्रितून येतोय. जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या अवघ्या 10 महिन्यांत या कारच्या तब्बल 70 हजार 555 युनिट्सची विक्री झाली आहे.

बाजारात एकीकडे XUV गाड्यांची क्रेझ वाढत असताना दुसरीकडे छोट्या फॅमिली कारची मागणीही कायम असल्याचं दिसतं आहे. याचाच प्रत्यय टाटा मोटर्सच्या टियागो या हॅचबॅक कारच्या विक्रितून येतोय. जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या अवघ्या 10 महिन्यांत या कारच्या तब्बल 70 हजार 555 युनिट्सची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या लोकप्रिय मॉडेल्समध्ये टियागोने आपलं स्थानं टिकवून ठेवलं आहे.
टाटा मोटर्सच्या 2026 मधील पहिल्या `10 महिन्याच्या मॉडेलनिहाय विक्रिच्या आकडेवारीनुसार टियागोची 70,555 युनिट्स विकली गेली. कंपनीच्या कारमध्ये विक्रिच्या बाबतीत टियागो तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर टाटा पंच असून तिच्या 2 लाख 2 हजार 794 युनिट्सची विक्री झाली. तर दुसऱ्या क्रमांकावर टाटा नेक्सॉन असून तिच्या 1 लाख 96 हजार 490 युनिट्स विकल्या गेल्या. टियागोने मात्र सिएरा, हॅरियर, अल्टाझ, कर्व्ह आणि सफारीसारख्या मॉडेल्सपेक्षा अधिक विक्री नोंदवली आहे.
आता कारच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर टाटा टियागोची एक्स शोरूम किंमत 4.77 लाख रूपयांपासून सुरू होणे आणि टॉप व्हेरिएंटसाठी ती 8.62 लाख रूपयांपर्यंत जाते. पेट्रोल आणि सीएनजी असे दोन्ही पर्याय यात उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये कार घेऊन इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक पर्याय ठरतो
टियागोमध्ये 1.2 ली. 3 सिलिंडर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 86 PS POWER आणि 113 NM TORK निर्माण करतं. CNG MODE मध्ये 75.5 PS POWER आणि 96.5 NM TORK मिळतो. गिअरबॉक्ससाठी 5- स्पीड मॅन्यूअल आणि 5 - स्पीड MMT चे पर्याय आहेत.
वैशिष्ट्यांच्या बाबतीत, यात 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, मागील एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी मिळते.
सुरक्षेसाठी, सर्व व्हेरिएंट्समध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.