तिचा दोघांवर जीव जडला, मग एकाच मंडपात दोघांशीही केलं लग्न; महिलेच्या अजब लग्नाची जगभरात चर्चा!

सध्या एका लग्नाची जगभरात चर्चा होत आहे. एका महिलेने एकाच लग्नात थेट दोघांशी लग्न केले आहे. या विवाह सोहळ्याचे फोटो सगळीकडेच व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

| Updated on: Mar 07, 2026 | 7:49 PM
1 / 5
प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. प्रेमाला देशाच्या सीमा नसतात. सध्या एका महिलेच्या अजब गजब प्रेमाची सगळीकडे चर्चा होत आहे. तिला एकूण दोन जणांवर प्रेम झाले आहे. विशेष म्हणजे तिने या दोघांसोबतही एकाच मंडपात लग्न केलं आहे.

प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. प्रेमाला देशाच्या सीमा नसतात. सध्या एका महिलेच्या अजब गजब प्रेमाची सगळीकडे चर्चा होत आहे. तिला एकूण दोन जणांवर प्रेम झाले आहे. विशेष म्हणजे तिने या दोघांसोबतही एकाच मंडपात लग्न केलं आहे.

2 / 5

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मुळची थायलंडमधील आहे. तिचे नाव डुआंगडुआन केत्सारो असेून ती 37 वर्षांची आहे. तिने ऑस्ट्रिया देशातील दोघांशी लग्न केले आहे. तिचा या दोघांवरही जीव जडला आहे. ही महिला एक गायक आणि गीतकार आहे.

3 / 5

तिचा विवाहसोहळा अत्यंत साधा होता. या विवाहात अनेक नातेवाईक, मित्रमंडळी सामील झाले होते. या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्या पहिल्या पतिचे नाव पटाया असे आहे. तर दुसऱ्या पतीचे नाव मॅकी असे आहे.

4 / 5

ती पटायासोबत अगोदर पाच वर्षे राहिली. नंतर तिची मॅकीसोबत ओळख झाली. तिला मॅकीचा स्वभावही आवडला. या दोघांची मैत्री नंतर प्रेमात बदलली. विशेष म्हणजे हे नातं तिने पटायापासून लपवलं नाही. त्यानंतर केत्सारोने कोणताही घाई न करता संपूर्ण विचाराअंती हे लग्न केले आहे.

5 / 5

हे लग्न करण्यापूर्वी तिघांनीही एकत्र बसून विचार केला. तिने आई-वडील आणि नातेवाईकांचाही सल्ला घेतला. त्यानंतर तिने या दोघांसोबतही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या विवाह सोहळ्याची सगळीकडे चर्चा होत आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us