The Family Man 3 OTT Release: ‘द फॅमिली मॅन ३’ भारतात ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार?

The Family Man 3 OTT Release: मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत असणारी ‘द फॅमिली मॅन ३’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता ही सीरिज कधी प्रदर्शित होणार हे समोर आले आहे. जरा तुम्हाला ही सीरिज पाहायची असेल तर जाणून घ्या...

| Updated on: Nov 18, 2025 | 11:47 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनसह ओटीटीवर कमबॅक करत आहेत. त्यामुळे चाहते ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहेत. शिवाय या शोचे पहिले दोन सीझन प्रचंड हिट ठरले होते. आता जर तुम्हाला या सीरिजचा तिसरा सिझन पाहायचा असेल तर चला जाणून घेऊया की ‘द फॅमिली मॅन’चा सीझन ३ ओटीटीवर कधी आणि किती वाजता प्रदर्शित होणार?

2 / 5
‘द फॅमिली मॅन’चा तिसरा सीझन शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजता इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) नुसार अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक्सक्लुझिव्हली प्रीमियर होणार आहे. जर तुम्ही आतापर्यंत पहिले सीझन पाहिले नसतील, तर नवीन चॅप्टर पाहण्यापूर्वी तुम्ही तेही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. त्यामुळे २१ नोव्हेंबरच्या आधी तुम्ही दोन्ही सिझन पाहून घेऊ शकता.

3 / 5
‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमध्ये श्रीकांतला त्याच्या करिअरच्या काही सर्वात धोकादायक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये एका नव्या षड्यंत्राचा सामना करताना श्रीकांत तिवारी हाच वाँटेड गुन्हेगार घोषित होतो. मजेदार बाब ही आहे की मनोजने तिन्ही सीझनमध्ये लीड रोल केला आहे. तर मागच्या सीझनमध्ये सामंथा रुथ प्रभू होती. यावेळी हे आणखी रोमांचक आहे.

4 / 5
‘द फॅमिली मॅन’मध्ये जयदीप अहलावत रुक्माच्या भूमिकेत कलाकारांच्या टोळीत सामील झाला आहे. तो श्रीकांतसाठी सर्वात मोठा चॅलेंज बनणार आहे. तर निम्रत कौरनेही सीरिजमध्ये व्हिलनची भूमिका केली आहे. यांच्या व्यतिरिक्त जुगल हंसराज, आदित्य श्रीवास्तव, पालिन कबाक आणि हरमन सिंघा हेही सीरिजमध्ये दिसतील. मात्र त्यांच्या भूमिकांच्या डिटेल्स अद्याप गुपीत ठेवल्या आहेत.

5 / 5
नव्या कलाकारांव्यतिरिक्त, प्रेक्षकांना जूने चेहरेही दिसतील, ज्यात जेके म्हणून शारिब हाशमी आणि प्रियमणीने साकारलेली सुचित्राची भूमिका समाविष्ट आहे जी अतिशय फेमस आहे आणि चाहत्यांना खूप आवडते. राज अँड डीके यांनी तिन्ही सीझनचे दिग्दर्शन केले आहे. आता चाहत्यांमध्ये तिसऱ्या सिझनची उत्सुकता वाढली आहे.