फक्त 24 तासात तयार झालेला चित्रपट, 30 कलाकार, 14 दिग्दर्शक, चित्रपटाचा गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड

30 कलाकार, 14 दिग्दर्शक, अवघ्या 24 तासात तयार झाला हा चित्रपट, प्रदर्शित होताच ठरला सुपरहिट. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली चित्रपटाची नोंद. कमाई किती?

| Updated on: Jul 15, 2026 | 1:14 PM
1 / 5
चित्रपट निर्मितीसाठी अनेक महिने, कधी कधी वर्षे लागतात. मात्र, तमिळ चित्रपटसृष्टीने 1999 मध्ये असा एक विक्रम केला, ज्याची आजही जगभर चर्चा होते. 'सुयमवरम' या तमिळ चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अवघ्या 24 तासांत पूर्ण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरही मोठा यशस्वी ठरला आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात कमी वेळात पूर्ण झालेल्या फीचर फिल्म म्हणून त्याची नोंद झाली.

2 / 5
या चित्रपटाची निर्मिती आणि सहलेखन गिरधारीलाल नागपाल यांनी केले होते. कॉमेडी आणि कौटुंबिक नाट्याचा मिलाफ असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अहवालांनुसार, सुमारे 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 50 कोटी रुपयांपर्यंत कमाई करत निर्मात्यांना दुप्पट परतावा मिळवून दिला.

3 / 5
'सुयमवरम'चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती प्रक्रिया. या चित्रपटासाठी 14 दिग्दर्शक, 19 छायाचित्रकार आणि 30 हून अधिक आघाडीचे कलाकार एकाच वेळी काम करत होते. एवढ्या मोठ्या टीममुळे केवळ एका दिवसात संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले, हीच बाब त्याला इतर चित्रपटांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देते.

4 / 5
चित्रपटाची कथा कुसेलन आणि त्यांची पत्नी सुशीला यांच्या मोठ्या कुटुंबाभोवती फिरते. कुसेलन यांच्या 60 व्या वाढदिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. रुग्णालयात त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजल्यानंतर ते मृत्यूपूर्वी आपल्या सर्व मुला-मुलींची लग्ने झालेली पाहण्याची इच्छा व्यक्त करतात.

5 / 5
त्यानंतर कुटुंबाकडून एक अनोखी जाहिरात दिली जाते. कुसेलन यांच्या कोणत्याही मुलाशी किंवा मुलीशी विवाह करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबाची संपत्ती आणि एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली जाते. या निर्णयानंतर घडणारे विनोदी, भावनिक आणि नाट्यमय प्रसंग चित्रपटाला अधिक रंगतदार बनवतात.

Follow Us