26 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्यातील अभिनेत्रीची स्टेप ठरली होती चर्चेचा विषय, आजही लोकांमध्ये त्या स्टेपची क्रेझ
2000 मधील 176 मिनिटांचा नॅशनल अवॉर्ड चित्रपट, ज्यामध्ये अभिनेत्याने केला होता असा डान्स की ठरला होता प्रचंड हिट. आजही प्रत्येक डान्सर ती स्टेप करतो फॉलो.

बॉलिवूडच्या सुवर्णकाळात अनेक गाणी अशी आली ज्यांनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही तर डान्सच्या दुनियेतही नवे ट्रेंड सेट केले. त्यापैकी एक आयकॉनिक डान्स नंबर म्हणजे ‘के सेरा सेरा’, जे आजही डान्सप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरते आहे.

2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुकार' या चित्रपटाने त्या काळात चांगलीच चर्चा निर्माण केली होती. या चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि नम्रता शिरोडकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

मात्र, या चित्रपटाच्या कथेपेक्षा त्यातील गाणी विशेष गाजली आणि त्यातलं सर्वात लोकप्रिय गाणं म्हणजे 'के सेरा सेरा’. हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पाडणारे ठरले. यातील वेगळ्या प्रकारचा म्युझिक साउंड आणि भन्नाट डान्स स्टेप्समुळे हे गाणं लवकरच प्रत्येक पार्टी, स्टेज शो आणि डान्स स्पर्धेचा अविभाज्य भाग बनले.

या गाण्यात प्रभू देवा यांचा भन्नाट आणि वेगळी डान्स स्टाईल पाहायला मिळते तर माधुरी दीक्षितच्या ग्रेसफुल स्टेपने गाण्याला एक वेगळीच उंची मिळवून दिली. विशेष म्हणजे या गाण्याची कोरिओग्राफीही प्रभु देवा यांनीच केली होती, ज्यामुळे ते डान्सच्या दृष्टीने एक मास्टरपीस ठरले.

आजही, जवळपास 25 वर्षांनंतरही, ‘के सेरा सेरा’ हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर हे गाणं नेहमी ट्रेंड होत असतं आणि तरुण पिढीतील डान्सर्स त्याचे स्टेप्स रीक्रिएट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यूट्यूबवरही या गाण्याला तब्बल 53 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.