प्रत्येक विवाहित महिलेच्या प्लेलिस्टमध्ये असतं हे 14 वर्षांपूर्वीचं सुपरहिट गाणं, 99 टक्के पुरुषांना माहितीच नाही
14 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, आजही प्रत्येक लग्न झालेल्या महिलांच्या प्ले लिस्टमध्ये नक्की असतं. अनेक महिला हे गाणं ऐकतात. ज्याला श्रीदेवीने बनवलं सुपरहिट.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या चित्रपटांमधील भूमिका आणि गाणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या त्यांच्या कमबॅक चित्रपटातील 'नवराई माझी' हे गाणे आजही लग्नसमारंभांमध्ये तितक्याच उत्साहाने वाजवले जाते.

चित्रपटातील कौटुंबिक लग्नाच्या प्रसंगावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात श्रीदेवीचा साधा, मोहक आणि उत्साही नृत्याविष्कार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. भारतीय गृहिणीच्या भूमिकेत त्यांनी केलेला अभिनयही विशेष गाजला.

या गाण्याला संगीतकार अमित त्रिवेदी यांनी पारंपरिक मराठी लोकसंगीताचा आधुनिक बॉलिवूड वेडिंग अँथम असा नवा साज दिला. महाराष्ट्रातील लग्नांमध्ये गायल्या जाणाऱ्या पारंपरिक 'नवराई माझी' या लोकगीतावर आधारित हे गाणे 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटामुळे देश-विदेशात लोकप्रिय झाले.

गेल्या 14 वर्षांत 'नवराई माझी' हे 2010 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय वेडिंग डान्स गाण्यांपैकी एक ठरले आहे. संगीत समारंभ, मेहेंदी आणि नवरीच्या एंट्रीसाठी हे गाणे आजही आवर्जून वाजवले जाते.

यूट्यूबवरील या गाण्याच्या अधिकृत व्हिडिओला 13 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. अनेक महिला लग्नानंतर देखील हे गाणं ऐकतात.