हे गाणं ऐकल्यानंतर मुली काजल लावायला घाबरायच्या, 58 वर्षांपासून गाणं सुपरहिट
58 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्यानंतर मुली काजल लावण्यासाठी घाबरत होत्या. नेमकं काय होतं कारण? आशा भोसले आणि शमशाद यांच्या आवाजमुळे गाणं आजही सुपरहटि.

हिंदी सिनेसृष्टीत अनेक गाणी अशी आहेत, ज्यांची लोकप्रियता काळाच्या ओघातही कमी झालेली नाही. 60-70 च्या दशकातील गाण्यांची क्रेझ आजही रसिकांमध्ये कायम आहे.
आशा भोसले यांच्या आवाजातील अनेक सदाबहार गाणी आजही श्रोत्यांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘कजरा मोहब्बत वाला, अखियों में ऐसा डाला’.
1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किस्मत’ या चित्रपटातील हे गाणं आशा भोसले आणि शमशाद बेगम यांच्या दमदार जुगलबंदीमुळे विशेष गाजले. दोघांमधील नोकझोक, छेडछाड आणि प्रेमभावना अतिशय मजेदार पद्धतीने या गाण्यात मांडण्यात आली आहे.
या गाण्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे वेगळे आणि धाडसी चित्रण. गाण्यात विश्वजीत यांनी महिलेची व्यक्तिरेखा साकारली होती. पारंपरिक वेशभूषा, काजळ आणि महिलांच्या अंदाजातील नृत्यामुळे त्यांचा लूक चर्चेचा विषय ठरला.
दुसरीकडे बबीता यांनी पुरुषाचा पोशाख परिधान करून गाण्यात विश्वजीत यांना रिझवण्याचा प्रयत्न केला. त्या काळात अशा प्रकारचे सादरीकरण अत्यंत वेगळे मानले जात होते. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काजळ आणि त्याच्या सौंदर्याशी संबंधित चर्चेलाही मोठी रंगत आली.