3 लग्नानंतरही प्रेमासाठी तडफडत राहिली अभिनेत्री, शेवट तर इतका भयानक की अंगावर काटा येईल

एक अशी अभिनेत्री होती जिने जवळपास 3 वेळा लग्न केलं. मात्र, कोणत्याही लग्नात ती खूश राहिली नाही. एकटेपणामुळे तिला नको त्या सवयी लागल्या होत्या. तिचा अंत तर अतिशय वेदनादायी होता.

| Updated on: Jun 02, 2026 | 10:08 AM
1 / 8
कलाकार हे कायमच चर्चेत असतात. मात्र, झगमगाटाच्या दुनियेत त्यांच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे याचा पत्ता कुणालाही लागत नाही. पडद्यावर मेकअपमध्ये सुंदर कपड्यांमध्या वावरणारे कलाकार खासगी आयुष्यात कोणत्या अडचणींचा सामना करत आहेत हे कळणे फार कठीण असते. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिच्यासोबत असंच काहीसं घडलं होतं.

कलाकार हे कायमच चर्चेत असतात. मात्र, झगमगाटाच्या दुनियेत त्यांच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे याचा पत्ता कुणालाही लागत नाही. पडद्यावर मेकअपमध्ये सुंदर कपड्यांमध्या वावरणारे कलाकार खासगी आयुष्यात कोणत्या अडचणींचा सामना करत आहेत हे कळणे फार कठीण असते. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिच्यासोबत असंच काहीसं घडलं होतं.

2 / 8

आम्ही ज्या प्रसिद्ध अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तिचे नाव मर्लिन मुनरो असं आहे. मर्लिन मुनरो ही हॉलिवूडची अतिशय सुंदर अप्सरा होती. तिने लाखो हृदयांवर राज्य केलं. पण तरीही ती आयुष्यभर एका खऱ्या जोडीदाराच्या शोधात राहिली. जो केवळ तिचं सौंदर्य पाहणार नाही, तर तिचं मन आणि हृदयही समजून घेईल. मात्र असे आनंदाचे क्षण मर्लिनच्या आयुष्यात कधीच आले नाहीत आणि कधी थोडेफार आनंदाचे क्षण आलेच, तरी दुःखाचे डोंगर एवढे मोठे होते की त्यापुढे हे छोटे क्षण जाणवलेच नाहीत.

3 / 8

साईडवॉकवर हवेत उडणारा स्कर्ट आणि मनमोकळेपणाने हसणारी मर्लिन मुनरो तिच्या बिंधास्त अंदाजासाठी ओळखली जात होती. काही लोक तिला अशा मुलीच्या नावानेही ओळखत होते, जी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांना आपल्या नाजूक आवाजात स्टेजवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. पण खऱ्या आयुष्यात मर्लिन या दोन्हीपैकी काहीच नव्हती.

4 / 8

मर्लिन आपलं खरं आयुष्य कधीच मोकळेपणाने जगू शकली नाही, ती नेहमीच एक मुखवटा घालून वावरली आणि कदाचित हेच तिच्या मृत्यूचं कारण बनलं. १ जून रोजी 'नोर्मा जीन बेकर' या नावाने जन्मलेली मर्लिन, ग्लॅडिस बेकर आणि चार्ल्स स्टॅनली गिफर्ड यांच्या पोटी जन्माला आली होती. मात्र काही काळानंतरच नोर्माच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि इतर दोन मुलांची जबाबदारी तिच्या वडिलांना देण्यात आली, तर नोर्मा आपल्या आईसोबत राहिली.

5 / 8

घटस्फोटानंतर नोर्माची आई तिला ऍटकिन्सन कुटुंबाकडे घेऊन गेली, जिथे ती बराच काळ राहिली. ऍटकिन्सन हे एक इंग्रज जोडपं होतं, जे चित्रपटांमध्ये काम करायचं. काही काळ संकटांचा सामना केल्यानंतर नोर्माच्या आईला मानसिक धक्का बसला आणि तिला मानसिक रुग्णालयात (मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूशन) पाठवण्यात आलं. आई वेड्यांच्या इस्पितळात गेल्यानंतर, नोर्माचं त्याच घरात शोषण करण्यात आलं, त्यानंतर तिला अनाथालयात पाठवण्यात आलं, तिथे ती १ वर्ष राहिली.

6 / 8

अनाथालयात अनेक हालअपेष्टा सहन केल्यानंतर नोर्माने जिम डोहर्टी नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं. पण हे लग्न फक्त ४ वर्षे टिकलं, त्यानंतर जिम युद्धासाठी निघून गेला. एकटेपणा दूर करण्यासाठी नोर्माने डिफेन्स प्लांटमध्ये नोकरी धरली, जिथे तिला एक फोटोग्राफर भेटला. त्याने तिचे काही फोटो काढले आणि याच फोटोंमधून तिने मॉडेलिंगच्या करिअरची सुरुवात केली.

7 / 8

मॉडेलिंगनंतर तिला 'ट्वेन्टीएथ सेंचुरी फॉक्स' कडून बोलावणं आलं. पण, या स्क्रीन टेस्टमध्ये पास होण्यासाठी तिला आपलं नाव बदलावं लागलं आणि नोर्माची ती 'मर्लिन मुनरो' बनली. मग एके दिवशी मर्लिनच्या आयुष्यात जॉनी हाइड नावाचा व्यक्ती आला, ज्याने तिला अनेकदा लग्नासाठी प्रपोज केलं. पण तिने प्रत्येक वेळी नकार दिला आणि काही काळानंतर त्याचं निधन झालं.

8 / 8

१९५३ मध्ये मर्लिनने जो डिमॅगिओशी लग्न केलं. पण, तिचा स्कर्ट उडण्याचा सीन आणि फोटो पाहिल्यानंतर तिच्या पतीला खूप राग आला आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं, त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. १९५६ मध्ये तिची भेट नाटककार ऑर्थर मिलर यांच्याशी झाली, ज्यांच्यासोबत मर्लिनने तिसरं लग्न थाटलं. पण, हे लग्नही फार काळ टिकलं नाही. मग काही काळानंतर १९६२ मध्ये मर्लिन तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूचं कारण ड्रग्सचा ओव्हरडोज असल्याचं सांगण्यात आलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us